AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात मोठं काहीतरी घडणार? ट्रम्प, शी जिनपिंग अन् पुतिन यांच्या बैठकीत काय चर्चा होणार?

जगात मोठं काहीतरी घडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग, पुतिन यांची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

जगात मोठं काहीतरी घडणार? ट्रम्प, शी जिनपिंग अन् पुतिन यांच्या बैठकीत काय चर्चा होणार?
Donald trump Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 8:01 AM
Share

जगात राजकीय घडामोडी वाढू लागल्या आहेत. त्यात चीनच्या शेन्झेनमध्ये तीन शक्तिशाली नेते डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग आणि क्लादिमीर पुतिन हे तिघे एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमासाठी तिघे शेन्झेनमध्ये पोहोचले आहेत. या नेत्यांची युद्ध, आर्थिक अनिश्चितता आणि एआयवर चर्चा होईल. या बैठकीची तुलना ही 1945 सालच्या याल्टा परिषदेशी केली जात आहे. याल्टा परिषदेत दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात अमेरिका, ब्रिटन आणि सोव्हिएत युनिएनचे नेते भेटले होते.

फेब्रुवारी महिन्यात 1945 साली याल्टा परिषद झाली होती. या परिषदेत नाझी जर्मनीची विभागणी, युरोपची राजकीय व्यवस्था, संयुक्त राष्ट्राची स्थापना या मुद्द्यांवर चर्चा झाली होती. आता 81 वर्षांनंतर तीन प्रमुख देशांचे नेते एकत्र येताहेत. याल्टा परिषद ही 4 ते 11 फेब्रुवारी 1945 रोजी क्रिमियाच्या याल्टा शहरात झाली होती. या क्रिमिया शहरावर आता रशियाचा ताबा आहे. रशियाने हे शहर युक्रेनकडून हिसकावून घेतलं होतं. याल्टा परिषद झाली, त्यावेळी दुसरं विश्व युद्ध अंतिम टप्प्यात होतं. परंतु जर्मनीचा पराभव आणि जपानविरुद्ध युद्धाचा शेवट बाकी होता. या परिषदेत जगातील तीन शक्तिशाली नेते सहभागी झाले होते.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुजवेल्ट, ब्रिटनचे पंतप्रधान विंस्टन चर्चिल आणि सोवियत संघाचे नेते जोसेफ स्टॅलिन या तीन नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. जगाची व्यवस्था कशी असेल, हा या बैठकीचा उद्देश होता. जर्मनीचा पराभव झाल्यानंतर शासन कसं चालेल, युरोपच्या राजकीय सीमा,  सत्तावाटप कसं होईल, युरोपचा प्रभाव कोणावर राहील, जपानच्या विरोधातील युद्धात सोव्हिएत संघाची भूमिका काय असणार, या सर्व मुद्द्यावर चर्चा झाली होती. यावेळी भांडवलशाही आणि साम्यवादावरही चर्चा झाली होती.

याल्टामध्ये सोव्हिएत संघाला पूर्व युरोपमध्ये वर्चस्व राखण्याची संधी मिळाली. पोलंडमध्ये नव्या सरकारमध्ये डाव्यांचा समावेश करण्याचा निर्णय झाला. जर्मनीचं भविष्य आणि त्यावर वर्चवस्व मिळवण्याबाबत निर्णय झाला. संयुक्त राष्ट्रांच्या निर्मिती आणि सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यांच्या नकराधिकारवरही करार झालाय. जपानविरुद्ध युद्धात सहभागी होण्याच्या बदल्यात सोव्हिएत युनियनला आशियामध्ये काही सवलतींचा प्रस्ताव देण्यात आला. खरंतर ही फक्त तीन नेत्यांची बैठक नव्हती. या बैठकीने युद्धानंतर जागतिक व्यवस्थेचा पाया घालण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण