AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगली हादरली, नेत्याच्या नातवावर घरात घुसून गोळीबार, चिमुकल्याचे जागीच गेले प्राण

सांगलीच्या भरवस्तीत घरात घुसून हल्लेखोरांनी एका स्थानिक नेत्याच्या घरात शिरुन गोळीबार करीत त्याच्या अवघ्या १४ वर्षांच्या नातवाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

सांगली हादरली, नेत्याच्या नातवावर घरात घुसून गोळीबार, चिमुकल्याचे जागीच गेले प्राण
Sangli firing news file photos
| Updated on: Jun 11, 2026 | 9:59 PM
Share

सांगलीत भयंकर घटना घडली आहे. सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी घुसून त्याच्या अवघ्या १४ वर्षांच्या नातवाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून पोलिसांनी या प्रकरणात हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहे. या मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्याने संपू्र्ण सांगली शहर सुन्न झाले आहे.

सांगलीमध्ये भरवस्तीमध्ये एका स्थानिक नेत्याच्या घरात घुसून चार ते पाच हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या हल्ल्यात घरातील एका १४ वर्षांचा चिमुरडा जखमी होऊन त्याचे प्राण गेले आहेत. त्यामुळे सांगलीत घबराट पसरली आहे. सांगलीच्या भरवस्तीत या अचानक झालेल्या घटनेने सांगली हादरली आहे.

नातवाला गोळ्या घातल्या

सांगलीतील माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात शिरलेल्या चार ते पाच मारेकऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केला.आधी मारेकऱ्यांनी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या गोळीबारात माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत मारुती बंडगर (वय १४ ) याला देखील गोळ्या घातल्या. त्यात गंभीर जखमी झालेल्या वेदांत याचा रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

मारुती बंडगर यांचा मुलगा वेदांत मारुती बंडगर ( १४ ) हा गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून विविध ठिकाणे पथके रवाना केली आहेत.

नातेवाईकांचा एकच आक्रोश

या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळतात संजय नगर पोलिसांच्या सह पोलीस अधीक्षक तुषार जोशी घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोराच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. जिल्ह्यात नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. व्यवसायिक वादातून ही घटना झाल्याच्या प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. नंतर संजय नगर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तर शवविच्छेदनासाठी वेदांतचा मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून या ठिकाणी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार