
राज ठाकरे यांनी नाशिक येथील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज ठाकरे म्हणाले की नाशिकमध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा नाशिक पालिकेवर ७०० कोटीचे कर्ज होते. आम्ही महापालिका कर्जमुक्त केली आहे. आमच्या पाच वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडून आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी महापालिका होती. रस्ते उत्तम केले होते. दर पावसाळ्यात पत्रकारांना चॅनलचे लोकं विचारायची खड्डे पडतात. मी इथल्या कंत्राटदारांची बैठक बोलावली होती. हे बजेट, तुमच्याकडे पैसे मागितले तर मला सांगा. बजेटमध्ये उत्तम रस्ते केले नाही आणि खड्डा पडला तर त्यात उभा करून मारेन असा दम दिला.नाशिकमध्ये उत्तम रस्ते झाले आणि हे होऊ शकते. या लोकांना कळू शकत नाही. पाच वर्षात फडणवीस येऊन काय बोलून गेले. ते झालं का सांगा असाही सवाल राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक आयटी पार्क, उड्डाण पूल, रिंग रोड, सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, आदिवासी प्रबोधिनी अशा घोषणा केल्या होत्या.राज ठाकरे पुढे म्हणाले की,’ देवेंद्र फडणवीस यांनी काही केले नाही आणि म्हणे नाशिक दत्तक घेणार धर्माच्या नावावर झुंजवत आहे. लाडकी बहीण योजनेत दीड हजार दिले. महागाई किती वाढली. तुमचे दीड हजार निघून गेले. सिलिंडर १५०० रुपये. कुठे टिकणार आहे दीड हजार रुपये. तुमची मुलं काय विचार करतील.आमच्या भवितव्याकडे कोणी पाहिलं नाही. का तर आमचा बाप विकला गेला. आमच्या आईने पैसे घेतले. आमचं भविष्य असंच गेल असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की सभोवतालचं वातावरण बकाल आहे. त्यामुळे पोरं दुसरीकडे शिकायला जात आहेत. कशाचा काही आटोक्यात नाही. अशा लोकांच्या हाती शहरं देणार आहात का. आनंद महिंद्रा, अंबानी टाटापासून सर्व आणली. ही माणसं कधी कुठल्या शहरात गेली नाही. प्रकल्प उभे केले. पाहायला काय मिळालं पराभव. ज्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या भूलथापांना बळी पडला. आजही तेच चालू आहे. आज पैसे घ्याल. किती दिवस पैसे टिकणार आहे. तेवढ्या किंमतीसाठी शहर दावणीला बांधत आहोत. याचाही विसर पडला असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरे यांनी कशासाठी निवडणुका लढवायच्या. निवडणुका हा नुसता खेळ केलाय का ? पैसे घ्यायचे मतदान करायचं आणि पाच वर्ष बोंबलत राहायचं. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा तुम्ही असे सांगत राज ठाकरे पुढे म्हणाले की तुमच्या चिल्ल्यापिल्यांच भविष्य चांगलं करायचं असेल तर तुम्ही शिवसेना आणि मनसेच्या हाती सत्ता द्या. पुन्हा चांगलं नाशिक घडवल्याशिवाय आपलं राहणार नाही असेही आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरे पुढे म्हणाले की क्रिकेटचा बोर्ड आहे, समोर. तिथे लिहिलंय टोटल. शिवसेना आणि मनसेचे किती नगरसेवक निवडून देणार. मला तिथे १०० चा आकडा पाहिजे. कुठेही गाफिल राहू नका. सज्ज व्हा असे आदेश राज ठाकर यांनी यावेळी दिला.