भाजप, हर्षवर्धन पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणात ‘गटारगंगा’, उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?

ही जी काही थेरं चालली आहेत ते हिंदुत्व नाही. कुणाच्याही कुटुंबावर, वैयक्तिक पत्नीवर, मुलांवर खोटे आरोप करणं हे हिंदुत्व नाही. याला नामर्द किंबहुना अक्कडमाशेपणा म्हणतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. माझे भाषण संपल्याची काही जण वाट बघताहेत. चिरकायची सवय ही राजकारणात अलिकडे विकृती झालीय.

भाजप, हर्षवर्धन पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणात 'गटारगंगा', उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?
जे मुंबईवरील हल्ल्यात अतिरेक्यांविरोधात लढले, त्यांना तुम्ही माफिया म्हणता?
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 9:15 PM

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातून भाजपवर जोरदार टीकेचे बाण सोडलेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी यावेळी हर्षवर्धन पाटलांवरून भाजपवर निशाणा साधलाय. वाईट काळामध्ये सोबत असलेला आपला सहकारी तेव्हा चालत होता. हर्षवर्धन पाटील आज तुमच्यात आल्यानंतर एकदम पवित्र झाले. गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा. तेच पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

पत्नीवर, मुलांवर खोटे आरोप करणं हे हिंदुत्व नाही

ही जी काही थेरं चालली आहेत ते हिंदुत्व नाही. कुणाच्याही कुटुंबावर, वैयक्तिक पत्नीवर, मुलांवर खोटे आरोप करणं हे हिंदुत्व नाही. याला नामर्द किंबहुना अक्कडमाशेपणा म्हणतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. माझे भाषण संपल्याची काही जण वाट बघताहेत. चिरकायची सवय ही राजकारणात अलिकडे विकृती झालीय. त्यांना ती रोजगार हमी वाटते. हर्षवर्धन पाटील बोलले भाजपात का गेलो? अशी लोक भाजपाची ब्रँड अँबेसेडर आहेत. टीव्ही वरील जाहिरातीचा संदर्भ देतात. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आले, तर सोडत नाही. ईडी सीबीआयच्या माध्यामातून येऊ नका. समोरासमोर या हे मर्दाचे हिंदुत्वाचे लक्षण नाही. बंगाल सारखे लढण्याची तयारी दाखवा. हिंदुत्व आता धोक्यात ही इंग्रजांची नीती वापरून भेद केला जातो. शिवसेनाप्रमुखांचा मराठी म्हणून एकत्र या. मराठी अमराठी भेद होऊ देऊ नका. मराठा तितुका मेळवावा हिंदुत्व वाढवावा, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केले.

आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही

केवळ तुमची पालखी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाला. त्याच्यावर आरोप करताय. मागेही सांगितलं आम्ही पालखीचे भोई आहोत. जरूर आहोत. पण ती आमची राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीची पालखी आहे. हिंदुत्वाची पालखी आहे. तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाही आहोत. तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झाला नाही. देव, देश आणि धर्मासाठी जन्म झाला आहे. तो शिवसैनिक तुम्ही भ्रष्ट ठरवत आहात? का तर तुमच्या पालख्या वाहत नाही म्हणून? वाईट काळात शिवसैनिक चालत होता. आता मात्र चालत नाही. हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले तर पवित्र झाले. गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा. ते पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा. ही जी काही थेरं सुरू आहेत ते हिंदुत्व नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दिल्लीच्या तख्ताला हर हर महादेव दाखवू

हर हर महादेव काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये. पण दाखवायची वेळ आली तर दाखवावीच लागेल. हा सत्ता पिपासूपणा नाहीये? यात कोणता विचार आहे. मला दु:ख, राग का येतो? तोंडामध्ये बोळकं घालून बसले असतील हे शिवसेनेला बदनाम करणारे लोकं. 92-93मध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली नसती तर तुम्ही कुठे असता? असा सवालही त्यांनी केला.

उपटसुंभांपासून हिंदुत्वाला धोका

केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं हिंदुत्वाला धोका नाही. याच तर दिवसाची आणि क्षणाची वाट पाहत होतो. पण आता हिंदुत्वाला धोका आहे. तो परक्यांपासून नाही तर हे उपटसुंभ नव हिंदू उगवले आहेत त्यांच्यापासून हा धोका आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

गांधी आणि सावरकर तरी समजले का?

सावरकर शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का? गांधी हा शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का? गांधी आणि सावरकर तरी समजले का? असा सवाल करतानाच मी दोन वर्षापूर्वी बोललो होतो. माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. त्यावेळी गहजब माजला होता. झुंडबळी झुंडबळी अशी बोंब ठोकली. त्यावेळी मोहन भागवत म्हणाले झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाहीत. मग हे हिंदुत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं? कुणाला शिकवायचं? आणि कोणाकडून शिकायचं? हिंदुत्वाला धोका नाही हे सत्य असेल तर हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, फडणवीसांच्या दुखऱ्या नशीवर ठाकरेंचं बोट

Uddhav Thackeray LIVE : तर मी राजकीय जीवनातून बाहेर पडलो असतो, ‘त्या’ दगाबाजीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.