मनोज जरांगे पाटील यांना थेट मोठा झटका, आर्थिक व्यवहाराची होणार चाैकशी, जवळच्या सहकाऱ्यांची..
Manoj Jarange Patil Income Tax : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मोठा दणका बसला. त्यांच्या जवळच्या लोकांची आयकर विभागाकडून चाैकशी केली जाणार आहे. काही गंभीर आरोप सातत्याने केले जात आहेत, त्यावर थेट चाैकशी होईल.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवस उपोषण केले. यावेळी ते सरकारवर गंभीर आरोप करताना दिसले. फक्त आरोपच नाही तर त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठे विधान केले. पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जरांगे दिसले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तर खालच्या पातळीवर जाऊन जरांगे यांनी टीका केली. मनोज जरांगे यांनी 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. ते जालन्याहून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाले. शेवटी बीडमध्ये सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगे यांची समजूत काढण्यात यश मिळाले. मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारण्यात आली. उपोषणाची परवानगी नसतानाही जरांगे मोठ्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर ते पुन्हा परत गेले.
त्यातच आता सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना अत्यंत मोठा दणका देण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्याच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चाैकशी केली जाणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनातील नेते, व्यावसायिक आणि नातेवाईक यांची चाैकशी केली जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जात आहे.
यासोबतच आंदोलनात वेळोवेळी महागड्या गाड्या बघायला मिळाल्या. मिळालेली अधिक माहिती अशी की, आयकर रिटर्न, आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि आर्थिक संबंध तपासली जाणार आहेत. या आंदोलनासोबत जोडले गेलेले व्यक्ती , नातेवाईक आणि कंपन्यांना मिळालेल्या सरकारी कंत्राटांचा सर्व व्यवहार हा तपासला जाणार आहे. कंत्राटात झालेली वाढ, बोली प्रक्रिया या व्यवहारांची सर्व छाननी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील एका कंपनीला तब्बल 764.7 कोटींची सरकारी कामे मिळाल्याचा थेटपणे आरोप आहे. आता त्याचीच तपासणी होणार आहे. हे सरकारी कामे नक्की कशी मिळाली, हे देखील पुढे येईल. अजय बारसकर यांनी यावर आरोप केला. सरकारी कंत्राटदारांनी राजकीय फायदा मिळून दिला जात आहे. क्विड प्रो क्वो पुरावा नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मालमत्ता, जमीन आणि पैशांचा स्त्रोत या सर्वांची चाैकशी केली जाणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते, त्यावेळी मीडियाला बाहेर काढण्यात आले.