Mumbai Rain Update : वाहतूक ठप्प, सर्वत्र पाणी साचले… मुंबईमध्ये धो धो पाऊस, पुढील 5 तासात..
Mumbai Rain Update : राज्यभरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामध्येच मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळत आहे. पुढील काही तासात मुंबईमध्ये पाऊस अधिक कोसळण्याचा अंदाज आहे. अनेक भागात यामुळे वाहतूककोंडी झाली.

Rain Update : राज्यभरात अजूनही मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे. म्हणावा तसा पाऊस झाला नाही. आता पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळतंय. मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाला. सकाळीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलीये. पुढील काही तासात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीच्या जोरदार पावसामुळे पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे रात्री 1.46 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यादरम्यान अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले होते. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा धो धो सुरू झाला. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा आणि पाण्याच्या होणाऱ्या त्रासापासून दिलासा मिळणार आहे. पाऊस कमी झाल्याने अनेक भागात पाणीकपात सुरू आहे. जर पाऊस असाच राहिला तर पाणीकपातीचे संकट दूर होईल. मुंबईमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
मुंबई, ठाणे, पनवेल, वाशीमध्येही जोरदार पावसाला सुरूवात झाली. भारतीय हवामान विभागाने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. काही तासापासून पाऊस बंद असल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. सबवेमध्ये भरलेल्या पाण्याचा निचरा झाला आहे. मात्र, पावसाचा जोर पुन्हा वाढला तर अंधेरी सबवे बंद होऊ शकतो. कारण आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
दोन दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने कल्याण डोंबिवलीत हजेरी लावली आहे. रविवारी खरेदी निमित्त बाहेर निघालेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. उखाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. डोबिंवली आणि कल्याणच्या अनेक भागात रात्रभर पावसाने हजेरी लावल्याचे बघायला मिळाले. अजूनही काही भागात पाऊस सुरूच आहे. फलटण तालुक्यासह खटाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. संध्याकाळच्या सुमारास पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
मागील एक महिन्यापासून पावसाला विलंब झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामासाठी हा पाऊस फायदेशीर आहे. विशेष म्हणजे संततधार पाऊस सुरू असल्याने शेतीसाठी या पावसाचा फायदा होणार आहे. त्यामध्येच पुढील काही तासात पावसाचा जोर अधिक असेल. मुंबईत वाहने बंद पडल्यामुळे लोकांना ती रस्त्यावरून बाजूला ढकलावी लागली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, चालणेही कठीण झाले. अवघ्या एका तासाच्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे.