AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : काळजी घ्या… धो धो मुसळधार पाऊस कोसळणार, पुढील 24 तास धोक्याची, थेट..

Rain Update : राज्यात मॉन्सून दाखल झाला, पण म्हणाला तसा पाऊस हजेरी लावताना दिसला नाही. त्यामध्येच राज्यात सर्वदूर पाऊस कोसळताना दिसत आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

Rain Update : काळजी घ्या... धो धो मुसळधार पाऊस कोसळणार, पुढील 24 तास धोक्याची, थेट..
Rain Update
| Updated on: Jun 29, 2026 | 7:15 AM
Share

काल रात्रीपासूनच अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यात मॉन्सून काही दिवसांपूर्वी दाखल झाला. मात्र, म्हणावा तसा पाऊस कोसळताना दिसला नाही. 2 जूनलाच मॉन्सून केरळ दाखल झाला होता. पण तब्बल 15 दिवस अरबी समुद्रातच रेंगाळताना दिसला. राज्यात सर्वदूर पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र व्यापून आता मॉन्सून गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड भागात पुढे वाटचाल करत आहे. पुढील दोन दिवसात मॉन्सून अरबी समुद्र, मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागात दाखल होईल. राज्यात मॉन्सून दाखल झाला पण अजूनही समाधानकारक पाऊस काही पडत नाहीये. राज्यात पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

अमरावतीमध्ये आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोकणात काही भागात दमदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. पुढील 24 तासात राज्याच्या जवळपास सर्वच भागात धो धो पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा काही राज्यात देण्यात आला. नवी मुंबईत पावसाला सुरवात झाली. एपीएमसी मार्केट परिसरात पाणी भरले. नवी मुबंईतील सखल भागात पाणी भरले.

गेल्या अर्धा तासापासून नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू झाला. नवी मुंबईतील जुईनगर, वाशी, पनवेलमध्ये जोरदार पाऊस आहे. अर्ध्या-पाऊण तासाच्या पावसाने कल्याण डोंबिवलीतील नालासफाईची पोलखोल सदानंद चौक ते अहिल्याबाई चौक परिसर जलमय कल्याण डोंबिवली रात्री 9 .30 च्या सुमारास सुरू झालेल्या पावसामुळे कल्याण पश्चिमेतील सदानंद चौक ते अहिल्याबाई चौक परिसरात पावसामुळे पाणी साचले.

सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. उन्हाळ्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना पावसामुळे दिलासा मिळाला. सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र कडक ऊन पाहायला मिळाले मात्र सायंकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी लावली.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा