Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, धो धो पाऊस कोसळणार, मोठा अलर्ट, थेट..

India Meteorological Department : भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. आता राज्यात वारं फिरल्याचे बघायला मिळतंय. आज अनेक भागात धो धो पावसाचा इशारा देण्यात आला.

| Updated on: Oct 07, 2026 | 7:13 AM
1 / 5
राज्यात अनेक भागात पावसाने पाठ फिरवली. शेतीची आणि पिकांची स्थिती गंभीर आहे. त्यातच आता राज्यात वारं फिरल्याचे बघायला मिळत आहे. एकीकडे उकाडा वाढत असताना भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

राज्यात अनेक भागात पावसाने पाठ फिरवली. शेतीची आणि पिकांची स्थिती गंभीर आहे. त्यातच आता राज्यात वारं फिरल्याचे बघायला मिळत आहे. एकीकडे उकाडा वाढत असताना भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

2 / 5

पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने मॉन्सून राज्यातून गेल्याचे सांगितले असले तरीही राज्यात पाऊस कोसळताना दिसत आहेत. सातारा घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, कोल्हापूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस होईल.

3 / 5

नांदेड, हिंगोली, सोलापूर या जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावताना दिसणार आहे. मराठवाड्यात प्रचंड मोठा दुष्काळ आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

4 / 5

राज्यात पुन्हा वारं फिरल्याचे बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. यासोबतच गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर भागात पाऊस होईल. वादळी वाऱ्यासह हा पाऊस होण्याचे संकेत आहेत.

5 / 5

राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यापूर्वीच पाऊस कोसळत आहे. दरम्यान राज्यातील काही भागात उष्णता चांगलीच वाढताना दिसत आहे. मालेगाव येथे उच्चांकी 38.4 तापमानाची नोंद झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us