Rain Update : 25, 26, 27, 28 तारखेला पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात तब्बल..
Rain Update : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही अनेक ठिकाणी हवामान विभागाने मोठा इशारा दिला. मुंबईमध्ये पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली.

देशभरात मॉन्सूनने दमदार हजेरी लावली. राज्यात यंदा मॉन्सूनचा पाऊस उशिराने दाखल झाला. पण सुरूवात चांगली झाली. यंदा मॉन्सूनवर एल निनोचे सावट आहे. दोन दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर 15 दिवस मॉन्सून केरळमध्ये रेंगाळताना दिसला. ज्यामुळे पेरण्या रखडल्या आणि चिंता वाढली. 22 जुलै रोजी मॉन्सूनने कोकण आणि मराठवाड्यात प्रगती केली. दुसऱ्या दिवशी कोकण आणि मराठवाडा मॉन्सूनने व्यापून टाकला. आज मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. राजस्थानपासून ते उत्तर महाराष्ट्रपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. यवतमाळ, लातूर, धाराशिव, सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, नांदेड, घाटमाथा पुणे या भागात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील आठ दिवस पावसाचा जोर अशाच राहण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये आज पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. आज येलो अलर्ट देत हवामान खात्याने हलक्या ते मध्यम सरींचा वर्षावाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आज पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, सध्या पावसाने विश्रांती घेतली असून कुठेही पाणी साचलेले नाही.
मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. सध्या जरी दिलासा असला, तरी पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मीरा-भाईंदर शहरात आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिक उकाड्याने हैराण झाले होते, मात्र या पावसामुळे संपूर्ण वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे आडगाव परिसरातील तीन ओढ्यांना पूर, पुराचे पाणी शेतात शिरून माती खरडून गेल्याने शेतकऱ्यांच नुकसान. आडगाव, मोहखेड, गडदगव्हाण, सोरजा, टाकळखोपा या सह, 10ते 12 गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला. मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे.