AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात धो धो पाऊस, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुणे, सातारा आणि कोल्हापूर..

राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहणार आहे. त्यामध्येच आजही अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यात धो धो पाऊस, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुणे, सातारा आणि कोल्हापूर..
heavy rain
| Updated on: Aug 04, 2026 | 10:01 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस कमी अधिक प्रमाणात कोसळत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. सातारा, पुणे आणि कोल्हापूरमध्ये आज पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने आज सातारा, पुणे, कोल्हापूर घाटमाथ्यावर मोठ्या पावसाचा इशारा दिला. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मुंबईमध्येही पावसाची शक्यता आहे. रात्रभर अनेक भागात पाऊस झाला. त्यातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला. विदर्भात पावसाचा हाहाकार उडाला आहे. सतत पाऊस कोसळत आहे.

हवामान विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले की, 6 ते 9 ऑगस्ट दरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात आणि 4 ते 9 ऑगस्ट दरम्यान देशातील विविध राज्यात मुसळधार पाऊस होईल.

बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने बहुतांश नद्या- नाले वाहू लागले. 13 पैकी 11 तालुक्यांतील 91 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, या पावसाचाही जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या जिवंत जलसाठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.. धरणातील जिवंत जलसाठा अद्याप शून्य टक्के असून, प्रकल्पाला जीवनदान देणाऱ्या मराठवाडा भागात अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.

सध्या केवळ धामणा नदीला प्रवाह सुरू झाला असला, तरी खडकपूर्णा धरण अद्याप पावसाच्या प्रतीक्षेतच आहे.. ऑगस्ट महिना सुरू झाला असला तरी शून्य टक्के जलसाठा असल्याने चिंता व्यक्त होत आहे.. 24 तासांत झालेल्या पावसामुळे धरणात केवळ 200 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढण्यासाठी अजून पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोकणात पाऊस सुरू आहे. नदी क्षेत्रात समाधानकारक पाऊस होतोय. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्यावर गेली. खेडमधील जगबुडी नदीची पातळी 5.40 मीटर. कोकणात पावसाचा जोर कमी, पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी