AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात या तारखेला धो धो पाऊस, मोठा इशारा, अतिवृष्टीसह..

Maharashtra Weather Update : जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा पाठ फिरवली. यामध्येच पावसाबद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे येतंय. पुन्हा एकदा राज्यात धो धो पाऊस कोसळणार आहे.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात या तारखेला धो धो पाऊस, मोठा इशारा, अतिवृष्टीसह..
Maharashtra Weather Update
| Updated on: Jul 14, 2026 | 7:41 AM
Share

मागच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. उष्णता वाढत आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. यादरम्यानच सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भागात हलका पाऊस होईल. सध्या अरबी मसुद्रात अफगाणिस्तानच्या दिशेने वारे वाहत आहे. ज्यामुळे मॉन्सूनचा प्रभाव कमी झाला. 20 जुलैला पुन्हा मॉन्सून जोरदार हजेरी लावण्याचा अंदाज आहे. काही भागात रात्री जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणही बघायला मिळतंय. हिस्सार, गोरखपूर, माणिपूरपर्यंत मॉन्सून सक्रिय आहे. बांगलादेश येथे समुद्रसपाटीपासून 4.5 ते 58 किलोमीटर उंचीवर वारे वाहत आहे.

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. 20 जुलैदरम्यान राज्यात पुन्हा एकदा धो धो पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे. -नंदुरबार जिल्ह्यात पुढील 10 दिवसांत पाऊस न झाल्यास शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

विरचक धरणात 47 टक्के पाणीसाठा, मात्र गाळामुळे वापरयोग्य पाणी कमी. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य; गरज पडल्यास शेतीसाठीचे पाणी बंद करण्याचे संकेत. सध्या शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा; परिस्थिती गंभीर झाल्यास कठोर निर्णय प्रशासनाकडून घेतले जाऊ शकतात. बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने धारूर परिसरातील पिकांनी टाकल्या माना, धान सुकायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.

जुलै महिना अर्धा संपला तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणी केली मात्र आता पावसाने दांडी मारल्याणे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. अनेक भागातील पिके सुकायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांवर तिहेरी संकट ओढावण्याची शक्यता. त्यामध्येच 20 जुलैनंतर राज्यात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान