पेट्रोल-डिझेलनंतर राज्यावर मोठं आसमानी संकट, तब्बल 17 जिल्हे संकटात, प्रशासनाकडून..
Maharashtra Temperature Today 15th May 2026 : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा जारी केला. राज्यावर दुहेरी संकट आहे.

राज्यात दुहेरी वातावरण बघायला मिळतंय. उष्णता वाढत असतानाच आज पावसाचा इशारा देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. अवकाळी पाऊस राज्यातून काही जाण्याचे नाव घेत नाहीये. मराठवाड्यातील काही भागात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी केला. उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह पावसाने मोठे थैमान घातले. तब्बल 100 लोकांचा यादरम्यान मृत्यू झाला. निसर्गाचे एक भयानक रूप उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळाले. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 45.9 अंश सेल्सिअस तापमान होते. अनेक जिल्ह्यांमध्ये 44 च्या आसपास तापमान नोंदवण्यात आले. जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा, पालघर, रायगड, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला.
नांदेड, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. कुठे पाऊस तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. बीड येथे अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कऱ्हेवडगाव येथे घराचे व शेतीचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अकोला शहरात उष्णतेचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. उष्णतेने कहर केला.
मालेगावात उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण होत आहे. मालेगाव तालुक्यातील काही विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यातच उन्हाळ्याचा भडका वाढत आहे. पाण्याची दिवसेदिवस पातळी खालावत चाललेली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह पालघर आणि ठाणे येथे उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत असून यामुळे नागिरकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आर्द्रतेसह प्रमाणही वाढले असल्याने घामाचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काही महतवाच्या सूचना देण्यात आल्यात. दुपारी शक्यतो अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे. यासोबतच उष्णघाताची लक्षणे असल्यास तात्काळ रूग्णालयात जावे.