मोठी बातमी! देशात लवकरच बॉम्बस्फोट होणार? धमकीच्या मेलने खळबळ

Bomb Blast Mail : देशात लवकरच बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीचा मेल आला आहे. तशी माहिती महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना तशी माहिती देण्यात आली आहे.

मोठी बातमी! देशात लवकरच बॉम्बस्फोट होणार? धमकीच्या मेलने खळबळ
bomb blast in india
| Updated on: May 13, 2025 | 2:35 PM

Bomb Blast Mail : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या वाद चालू आहे. पहलगाम हल्ल्यानंतरहा वाद जास्तच वाढलाय. सध्या मात्र दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला संबोधित करत पाकिस्तानला चांगलेच खडसावले आहे. आम्ही दहशतवादी आणि दहशतवादाला पाठिंबा देणारे सरकार यांना वेगळे मानत नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. असे असतानाच आता देशात लवकरच बॉम्बस्फोट होणार असा धमकीचा मेल आहे. या धमकीच्या मेलमुळे देशात खळबळ उडाली आहे.

मेलमध्ये नेमकं काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार देशात लवकरच बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीचा मेल आला आहे. तशी माहिती महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. सोबतच मुंबई पोलिसांकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे.

सोमवार ते बुधवार या काळात होणार बॉम्बस्फोट?

आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रुमला हा धमकीचा मेल आला आहे. याच मेलच्या अनुषंगाने सोमवार ते बुधवार या काळात सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. धमकीच्या मेलमुळे सगळीकडे सध्या खळबळ उडाली आहे.  सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाची स्थिती आहे. असे असतानाच हा मेल आल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोणतीही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

मोदींनी पाकिस्तानला खडसावलं?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद सध्या थोडा शमला आहे. पण मोदी यांनी 12 मे रोजी देशाला संबोधित करत पाकिस्तानला चांगलेच खडसावले आहे. टेटर आणि ट्रेड एकत्र चालू शकत नाही. रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाहीत, असं म्हणत मोदी यांनी आम्ही यापुढे दहशतवादी हल्ले खपवून घेणार नाही, असं थेट सांगून टाकलं आहे.

मेल कोणी केला, कसून घेतला जातोय शोध

दरम्यान, याआधीही मुंबई शहरासह देशांच्या इतर भागात धमकीचे मेल आलेले आहेत. यावेळीही धमकीचा मेल आला असून त्यााला प्रशासनाने गांभीर्याने घेतलं आहे. हा मेल नेमका कोणी पाठवला? याचा कसून शोध घेतला जात आहे.