
हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढत आहे. राज्यातील काही भागांमध्ये दुपारननंतर पावसाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली. संपूर्ण डिसेंबर महिना राज्यात थंडी होती. मात्र, वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस झाला आणि थंडीही गायब झाली. उत्तरेकडे थंडीचा मोठा अलर्ट देण्यात आला. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात उत्तरेकडून शीतलहरी राज्यात पोहोचत नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये उत्तरेकडील तापमानात मोठी वाढ होईल, असे सांगितले जात आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात जानेवारी महिन्यातही थंडी कायम असेल. सध्याच्या परिस्थितीनुसार, हवामानात चढउतार बघायला मिळतोय. दोन ते तीन दिवसांनंतर तापमानात घट होईल. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली
फक्त ढगाळ वातावरणच नाही तर अनेक शहरांमधील वाढलेले प्रदूषण हा गंभीर मुद्दा बनत चाललेला आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर थेट परिणाम होताना दिसतोय. पुणे, मुंबई आणि दिल्ली या शहरात झपाट्याने प्रदूषण वाढत असून हवा सायंकाळच्या वेळी पूर्णपणे विषारी होत आहे. डॉक्टरांनी श्वसनासंबंधित आजार असलेल्या लोकांनी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे सांगितले. वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.धुळ्यात 7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. नागपूर, यवतमाळ, गोदिंया, भंडारा आणि जळगावमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. आजही अनेक भागांमध्ये पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.
16 ते 19 जानेवारी दरम्यान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम आणि जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. 18 आणि 19 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही पावसाची शक्यता आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.