अखेर तो क्षण आला, मॉन्सूनबाबत आनंदाची बातमी, 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, 24 तास..

राज्यात आजही पाऊस हजेरी लावणार आहे. मॉन्सून आज केरळमध्ये दाखल होईल. मॉन्सूनकरिता केरळमध्ये अनुकूल वातावरण आहे. मॉन्सून राज्यात दाखल होण्यापूर्वीच जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आजही भारतीय हवामान विभागाने अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला.

अखेर तो क्षण आला, मॉन्सूनबाबत आनंदाची बातमी, 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, 24 तास..
Heavy rain
| Updated on: Jun 04, 2026 | 7:16 AM

मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यापूर्वीच राज्यासह देशात जोरदार पाऊस सुरू आहे. चक्रीवादळासह पाऊस हजेरी लावतोय. मुंबई, रायगड, सिंधुदुर्गमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. केरळमध्ये आज मॉन्सून दाखल होईल. वर्धा आणि ब्रह्यपुरी येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. रायगड, मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. वर्धा येथे उष्णतेनंतर आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. वर्धा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. काल राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.आजही अनेक भागात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. यासोबतच देशातील अनेक राज्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. 10 पेक्षा जास्त राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला.

कालही राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. मालेगाव येथे वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. वातावरणात गारवा, तापमानात घट झाली. खरीपपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण मशागतीच्या कामांना दिलासा मिळणार. खरीपपूर्वी शेती कामांना शेतकऱ्यांनी सुरूवात केलीये.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली, बोंबिल टेक येथे मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस, ढगाळ वातावरण आणि गार वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली होती. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज सकाळपासून वातावरणात पुन्हा बदल दिसून आला असून कडक उन्हामुळे तापमानात वाढ झाली आहे.

नंदुरबारच्या जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. मॉन्सूनपूर्व पाऊस आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदचा वातावरण. कृषी विभागाकडून जोपर्यंत 100 मिलिमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याच्या शेतकऱ्यांना पेरणी न करण्याच्या आवाहन करण्यात आले. यंदा राज्यात पाऊस चांगला असण्याचा अंदाज आहे. मॉन्सून केरळमध्ये आला नाही तरीही राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us