Bigg Boss 20 : एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर, सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी; आज ‘या’ अभिनेत्याची सलमानच्या शोमध्ये एन्ट्री
Bigg Boss 20 : सलमान खानच्या 'बिग बॉस 20' शो मध्ये एक स्पर्धक असाही आहे जो कधीकाळी वेटर म्हणून काम करत होता. मात्र कठोर मेहनतीने त्याने अभिनय क्षेत्रात त्याचं नाव कमावलं, सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा...

Bigg Boss 20 : कलर्स टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा ‘बिग बॉस ’ हा रिॲलिटीशो अखेर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. कालपासून म्हणजेच 6 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या शोचा हा 20 वा सीझन आहे. यंदाल 16 सेलिब्रिटी या शोमध्ये स्पर्धर म्हणून आलेत. त्यान अनेक प्रसिद्ध कलाकारांची नावं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता आसिफ खान. त्याने प्रचंड संघर्ष आणि कठोर मेहनत करत फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचं स्थान निर्माण केलंय. मात्र त्याच्या आयुष्यात एक वेल अशी होती की हाच आसिफ एक वेटर म्हणून नोकरी करत होता, पण कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने त्याचं नशीब आणि आयुष्य दोन्ही बदललं. आज तो एक नावजालेला अभिनेता म्हणून ओळखला जातो.
बऱ्याच जणांना माहीत नसेल पण आसिफ खानने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या लग्नात वेटर म्हणून कामही केलंय. एवढंच नव्हे तर लग्नात त्याने भांडीदेखील धुतली. सैफ-करीनाला भेटायची इच्छा त्याने व्यक्त केली होती मात्र तेव्हा त्याला त्यांना भेटू दिलं नव्हतं. चला जाणून नेमकं काय घडलं..
पंचायतमधून मिळाली प्रसिद्धी
आसिफ खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक सीरीज आणि चित्रपटात काम केलं. मात्र प्राइम व्हिडीओच्या ‘पंचायत’ सीरिजमधून त्याला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली, त्याचं नाव घराघरांत पोहोचलं. या सीरिजमध्ये त्याने गणेश नावाच्या इसमाची भूमिका निभावली. तो फुलेरा गावचे रहिवासी परमेश्वर यांचा जावई असतो. गणेश हा एक असा इसम असोत जो अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरून नाराज होत असतो. पण लोकांना त्याची ही भूमिका खूप आवडली होती, आजही तो त्या नावाने, त्या भूमिकेमुळे ओळखला जातो.
View this post on Instagram
ताज हॉटेलमध्ये काम करायचा आसिफ
आज आसिफ खूप प्रसिद्ध आहे, या क्षेत्रात त्याचा चांगला जम बसलाय, पण इथपर्यंत पोहोचण्याच्या त्याचा प्रवास फार सोपा नक्कीच नव्हता. एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितलं होतं की – सुरूवातीला जेव्हा तो मुंबईत आला, तेव्हा उदरनिर्वाहासाठी, पैसे कमावण्यासाठी त्याने वेटर म्हणून काम केलं. त्याने अनेक हॉटेल्समध्ये नोकरी केली. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या लग्नाचं रिसेप्शन 2012 साली ताज हॉटेलमध्ये झालं, तेव्हा आसिफ ताजमध्ये काम करत होता.
मी करीना-सैफ यांना भेटू शकतो का, असं त्याने मॅनेजरला विचारलंही होतं, पण मॅनेजरने त्याला परवानगी दिली नाही. त्यानंतर आसिफ गपचूप त्याचं काम करू लागला, त्याने भांडीही घासली. मात्र त्यानंतरही आसिफने कधीच हार मानली नाही आणि कठोर मेहनत सुरूच ठेवली. आता तो सलमान खान सारख्या मोठ्या सुपरस्टारच्या शोमध्ये स्पर्धक म्हणून आलाय.
