AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Update : दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अस्मानी संकट, मुसळधार पाऊस कोसळणार; राज्यात कुठे-कुठे पाऊस पडणार?

दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अस्मानी संकट असणार आहे. तर पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

IMD Update : दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अस्मानी संकट, मुसळधार पाऊस कोसळणार; राज्यात कुठे-कुठे पाऊस पडणार?
rain updateImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 8:41 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील विविध भागातील शेतकरी बांधव पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जुलै महिन्यात जोरदार पाऊस बरसल्याचे दिसून आले. परंतु ऑगस्ट महिन्यात फारसा पाऊस पडला नाही. त्यात दहीहंडी उत्सव एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अस्मानी संकट येऊन ठेपलं आहे. हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये ५ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झालाय. त्यामुळे हवामान ढगाळ आणि दमट राहिलं आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. मात्र आता मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अचानक हवामान बदलल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. रस्ते, रेल्वे आणि वाहतुकीवर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

आज कुठे पाऊस पडणार?

राज्यात आज पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. धुळे, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया विदर्भातल तीन जिल्हायंना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर नंदूरबार, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, परभणी, सोलापूर, जालना आणि सांगलीत तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उद्या म्हणजे 5 सप्टेंबर रोजी नाशिक, नंदूरबार, नांदेड, धुळे या जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे. हे जिल्ह्याशिवाय इतर भागाकत पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. दुसर्‍या आठवडा म्हणजे 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर रोजी विदर्भात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रात पाऊस हा मध्यम ते सामान्य राहण्याची शक्यता आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी