
भारतात सध्या सर्वत्र जीवघेणा उन्हाळा, उकाडा असून लोकं गरमीने हैराण झाले आहेत. अनेकांना हीटवेव्हचाही तडाखा बसत असून उष्माघातामुळे काही ठिकाणी लोकांचा बळीही गेल्याचे वृत्त आहे. मात्र याच भारतात सध्या परस्परविरोधी तापमान दिसत आहे. काही राज्यांत, उन्हाचा कहर दिसत असतानाच दुसरीकडे काही भागांत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि बर्फवृष्टीमुळे लोकं हैराण झाले आहेत. देशाच्या अर्ध्याहून अधिक भागात उष्णतेमुळे लोकांचे जीवन कठीण झालंय, तर उर्वरित भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील हवामान पुन्हा एकदा बदलत आहे. एकीकडे लोक कडक उन्हाचा सामना करत असताना, दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा धोका आहे. हवामान विभागाने 32 हून अधिक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
काश्मीर-लडाखमध्ये विध्वंस
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये हवामानाने भयानक रूप धारण केले आहे. रामबनमध्ये ढगफुटीमुळे चिनाब नदीला पूर आला, ज्यामुळे अनेक घरे आणि रस्ते उद्ध्वस्त झाले. भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद आहेत आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर लडाखमध्ये अनपेक्षित बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, वीज आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने लोकांचे हाल होत आहेत.
अनेकांना हीटवेव्हचाही तडाखा बसत असून उष्माघातामुळे काही ठिकाणी लोकांचा बळीही गेल्याचे वृत्त आहे. मात्र याच भारतात सध्या परस्परविरोधी तापमान दिसत आहे. काही राज्यांत, उन्हाचा कहर दिसत असतानाच दुसरीकडे काही भागांत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि बर्फवृष्टीमुळे लोकं हैराण झाले आहेत.
दक्षिण आणि मध्य भारत में हीटवेव्हचा इशारा
रविवारी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा देशातील सर्वात उष्ण शहर होतं, तिथे तापमान 44.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. विदर्भ, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकातील अनेक भागात उष्ण वाऱ्यांमुळे लोकं अक्षरश: भाजून निघत आहेत. हवामान खात्याने या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
या राज्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळाची चिन्हं
भारतीय हवामान खात्याच्या सांगण्यानुसार, पुढील काही दिवस देशातील 23 हून अधिक राज्यांमध्ये वादळी वारे आणि पावसाची मालिका सुरूच राहील. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये ताशी 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, तर ईशान्य भारतात वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संभाव्य कालावधी आणि पावसाची स्थिती:
21-25 एप्रिल : कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडू
22-24 एप्रिल : राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश
22-24 एप्रिल : अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
पुढील 5 दिवस: गोवा, पाँडिचेरी, यानम, रायलसीमा येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता