AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदुस्थानचा राष्ट्र ध्वज भगवाच हवा, भिडे गुरुजी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने 15 ऑगस्ट निमित्ताने हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली आहे. मात्र आता ही पदयात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत.

हिंदुस्थानचा राष्ट्र ध्वज भगवाच हवा, भिडे गुरुजी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
Bhide GurujiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 2:00 PM
Share

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने 15 ऑगस्ट निमित्ताने हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून धारकऱ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन ही रॅली काढली.  अखंड भारत व्हावा, या उद्देशाने ही पदयात्रा काढाण्यात आल्याची माहिती यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान या पदयात्रेमध्ये संभाजी भिडे यांच्यासह  शेकडो धारकरी सहभागी झाले होते. धारकऱ्यांच्या हातात यावेळी भगवे ध्वज, भारत मातेचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे फोटो, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून आला, सांगली शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.

दरम्यान याच कार्यक्रमाचं एक पोस्टर देखील व्हायरल होत असून, या पोस्टरवर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अखंड हिन्दुस्थानचे स्वप्न उराशी बाळगून ‘अखंड हिन्दुस्थानचा राष्ट्रध्वज म्हणून परम पवित्र भगवाच असला पाहिजे’ हे जगाला ठणकावून सांगण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे हिंदवी स्वराज्य स्वत्यंत्रदिन पदयात्रा असा मजकूर आहे. यावरून आता पुन्हा एकदा संभाजी भिड हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. ही हिंदवी स्वराज्य स्वत्यंत्रदिन पदयात्रा संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली होती, या रॅलीमध्ये शेकडो धारकरी सहभागी झाले हेते.

यावरून आता काँग्रेसने भिडे गुरुजींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मनोहर भिडे यांच्याकडून स्वातंत्र्य दिनी हिंदवी स्वराज्य स्वत्यंत्रदिन पदयात्रा काढण्यात आली.  स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच संभाजी भिडे हे राष्ट्रध्वजाचा अपमान करत आहेत. अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच वंदे मात्रमचा अपमान झाल्यास शिक्षा मग राष्ट्रध्वजाचा अपमान झाला तर तो कसा काय खपवून घेतला जातो, असा सवालही यावेळी सावंत यांनी उपस्थित केला आहे.

तर दुसरीकडे यावर भाजपकडून देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.  कोण काय म्हणत याला महत्त्व नाही. तिरंगा हाच देशाचा ध्वज आहे, भगवा हा आमचा स्वाभिमान आहे. मात्र देशाचा राष्ट्रध्वज हा तिरंगाच अशी प्रतिक्रिया या पदयात्रेवर मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप