AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर? गिरीश महाजन येताच मंत्र्याचं बैठकीतून वॉक आऊट

मोठी बातमी समोर येत आहे. आज जळगावमध्ये भाजपच्या जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत मंत्रि गिरीश महाजन दाखल होताच, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी काढता पाय घेतल्याचं पहायला मिळालं.

मोठी बातमी! भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर? गिरीश महाजन येताच मंत्र्याचं बैठकीतून वॉक आऊट
girish mahajanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 8:23 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. आज जळगावमध्ये भाजपच्या जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत मंत्री गिरीश महाजन दाखल होताच, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी काढता पाय घेतल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. रक्षा खडसे यांची उद्या दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आहे.  या बैठकीसाठी त्यांना दिल्लीमध्ये जायचं आहे, त्यांचं विमान सात वाजता असल्यामुळे त्या बैठकीतून एक तास आधीच बाहेर पडल्या, त्यांनी त्याबद्दल मला माहिती दिली आहे, असा खुलासा यावर मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. पक्षामध्ये कोणताही वाद नाही, त्यांच्या घरचा काय विषय असेल तो वेगळा विषय आहे, असंही यावेळी महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील सर्व बडे नेते उपस्थित होते. परंतु निमंत्रण असून देखील भाजप नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, एकही भाजप नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता, त्यामुळे मंत्री रक्षा खडसे या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

त्यातच आज भाजपच्या जळगाव जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये गिरीश महाजन येताच रक्षा खडसे बैठकीतून बाहेर पडल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मात्र यावर महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उद्या रक्षा खडसे यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आहे. त्यासाठी त्या बैठकीतून एक तास आधीच बाहेर पडल्या असा खुलासा यावर गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच पक्षात कोणतेही अंतर्गत वाद नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दरम्यान खडसे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे एकनाथ खडसे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. तसेच महाजन यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?