AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधल्या विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक आणि पर्यटनप्रेमी मैदानात

मोठं अग्निदिव्य पार करून नाशिकमधून नुकत्याच सुरू झालेल्या विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी, उद्योजक आणि पर्यटनप्रेमी देखील आता मैदानात उतरले आहेत.

नाशिकमधल्या विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक आणि पर्यटनप्रेमी मैदानात
| Updated on: Dec 07, 2020 | 7:38 PM
Share

नाशिक : मोठं अग्निदिव्य पार करून नाशिकमधून नुकत्याच सुरु झालेल्या विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी, उद्योजक आणि पर्यटनप्रेमी आता मैदानात उतरले आहेत. नाशिकमधून उडणाऱ्या विमानांचं वेळापत्रक दर्शवणारे फलक शहरातील काही सामाजिक संस्थानी स्वखर्चाने लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एकामेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ ही ओवी नाशिकच्या विमानसेवेला सध्या लागू पडते आहे. (Initiative of Entrepreneurs and Tourism Lovers to Promote Airlines in Nashik)

शहराच्या प्रमुख रस्त्यावर नाशिकमधून उडणाऱ्या विमानांचे वेळापत्रक लावण्याची तयारी सध्या सुरु आहे. हे वेळापत्रकाचे फलक महापालिका किंवा विमान कंपन्यांकडून नाही तर शहरातील पर्यटन प्रेमी आणि उद्योजकांकडून स्वखर्चाने लावले जाणार आहेत. मोठ्या मुश्किलीने सुरु झालेली विमानसेवा नाशिकच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, यासाठी आता पर्यटनप्रेमी आणि उद्योजक मैदानात उतरले आहेत.

दुसरीकडे आता नाशिकच्या ओझर विमानतळावर नाईट हॉल्टला देखील HAL कडून परवानगी मिळाल्याने विमानांची वाहतूक वाढणार आहे. पर्यायाने नाशिक आता हैदराबाद, दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबादला थेट जोडलं जाणार आहे.

खरं तर यापूर्वी देखील अनेक मोठ्या विमान कंपन्यांची सेवा नाशिकमधून सुरु करण्यात आली होती. मात्र कधी प्रशासनाचं दुर्लक्ष, कधी परवाग्या मिळत नसल्याने झालेला गोंधळ तर कधी प्रतिसाद मिळत नसल्याने कंपन्यांनी बंद केलेली सेवा अशा अनेक दिव्यातून नाशिकच्या विमान सेवेचा हा प्रवास झाला आहे. आता नाशिकवरुन सध्या मोठ्या शहरांना जोडणारी स्पाईस जेट, एअर इंडिया, ट्रू जेट, अलायन्स एअर अशा कंपन्यांच्या विमानसेवा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ही विमानसेवा टिकवण्यासाठी आणि आणखी वाढवण्यासाठी एकामेका साहाय्य करु अवघे धरू सुपंथ, असा प्रयोग सध्या नाशिकमध्ये सुरु आहे.

(Initiative of Entrepreneurs and Tourism Lovers to Promote Airlines in Nashik)

संबंधित बातम्या

नाशिकमधील हॉटेल देशात अव्वल, मुंबई विमानतळ भारतात सर्वोत्तम

विमान अपघातात नाशिकचे स्काॅर्डन लीडर शहीद

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.