IPS विश्वास नांगरे पाटील यांची बदली

नाशिक : नाशिक पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र सिंघल आणि विश्वास नांगरे पाटील हे दोन्हीही कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी समजले जातात. विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर, त्यांच्य जागी म्हणजे कोल्हापूर परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी प्रकाश मुत्याल …

vishwas nangre patil, IPS विश्वास नांगरे पाटील यांची बदली

नाशिक : नाशिक पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र सिंघल आणि विश्वास नांगरे पाटील हे दोन्हीही कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी समजले जातात.

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर, त्यांच्य जागी म्हणजे कोल्हापूर परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी प्रकाश मुत्याल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

नाशिकचे सध्याचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांची नियुक्ती कुठे झाली आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

कोण आहेत विश्वास नांगरे पाटील?

महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले आणि पोलिस सेवेते धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून परिचित असलेले विश्वास नांगरे पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. शिराळा तालुक्यातील कोकरुड हे त्यांचे मूळ गाव. विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता. म्हणून आजही त्यांच्याकडे अनेक तरुण प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतात. स्पर्धा परीक्षा करुन पोलिस सेवेत येऊ पाहणाऱ्यांचे विश्वास नांगरे पाटील हे रोल मॉडेल आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांनी आतापर्यंत कोणती पदं भूषवली?

  • लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
  • अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
  • पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • मुंबई पोलीसदल उपायुक्त
  • ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • अप्पर(अतिरिक्त -) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
  • पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *