Iran Israel War : उमरासाठी सौदी अरेबियात गेलेले महाराष्ट्रातील 50 हजारांपेक्षा अधिक मुस्लिम बांधव अडकले, पुन्हा भारतात आणण्यासाठी हालचाली

रमजानच्या काळात दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव उमरा या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात जात असतात. उमरासाठी सौदी अरेबियात गेलेले महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम बांधव तिथेच अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे.

Iran Israel War : उमरासाठी सौदी अरेबियात गेलेले महाराष्ट्रातील 50 हजारांपेक्षा अधिक मुस्लिम बांधव अडकले, पुन्हा भारतात आणण्यासाठी हालचाली
उमरासाठी सौदी अरेबियात गेलेले मुस्लिम बांधव अडकले
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 02, 2026 | 9:43 PM

रमजानच्या काळात दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव उमरा या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात जात असतात. उमरासाठी सौदी अरेबियात गेलेले महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम बांधव तिथेच अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. अंदाजे 50 ते 1 लाख मुस्लिम बांधव हे सौदी अरेबियात अडकले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी माहिती दिली आहे. दरम्यान सौदी अरेबियात अडकलेल्या या मुस्लिम बांधवांना पुन्हा भारतात आणण्यासाठी आता राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. समोर आलेल्या माहितीप्रमाणे यंदा 500 पेक्षा अधिक टूर ऑपरेटर्सनी उमरा या धार्मिक विधीसाठी यात्रेकरूंना सौदी अरेबियात पाठवले आहे. मात्र अचानक युद्ध सुरू झाल्यामुळे हे मुस्लिम बांधव सौदी अरेबियात अडकले आहेत. त्यांना मदत मिळून देण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांची जशी सरकारकडे अधिकृत नोंद असते, तशी उमरासाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांची कोणतीही नोंद सरकारकडे नसते, दरवर्षी रमजानच्या काळात खासगी टूर ऑपरेटर्सच्या मदतीने हे मुस्लिम बांधव सौदी अरेबियाला जातात. यंदा 500 पेक्षा अधिक टूर ऑपरेटर्सनी उमरा या धार्मिक विधीसाठी यात्रेकरूंना सौदी अरेबियात पाठवले आहे, अशी माहिती समोर येत आहे. मात्र युद्धामुळे हे मुस्लिम बांधव आता तिथेच अडकले आहेत, अंदाजे हा आकडा एक लाखांच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान आता सर्वात मोठी अडचण ही आहे की, जे यात्रेकरून उमरा या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात जातात, त्यातील अनेक यात्रेकरू हे गरीब आणि अल्पउत्पन्न गटातील किंवा मध्यमवर्गीय असतात. मात्र आता अचानक अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानं हे मुस्लिम बांधव सौदी अरेबियामध्ये अडकले आहेत. जर त्यांचा मुक्कम तिथे आणखी वाढला तर त्यांना पैशांची अडचण येण्याची शक्यता आहे. मात्र आता त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

Follow Us