
खोकल्याच्या औषधामुळे 6 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात घडली आहे. छिंदवाडा जिल्ह्याच्या परासीया गावात लहान मुलांच्या मृत्यूमुळे खोकल्याच्या दोन प्रकारच्या औषधांवर प्रशासनाने तात्पुरती बंदी आणल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे या घटनेच्या तपासासाठी मध्य प्रदेश आणि केंद्र सरकारने तपास पथक नेमले आहे. खोकल्याच्या कफ सिरप पिल्याने गेल्या एका महिन्यात छिंदवाडा जिल्ह्यातील 6 मुलांचा मृत्यूची घटना घडली, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी शैलेंद्र सिंग यांनी कफ सिरप पिल्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे.
कफ सिरपमुळे किडन्या निकामी होऊन मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय असून संबंधित कफ सिरप वर जिल्ह्यात तातडीने बंदी घालण्यात आली आहे. पहिला संशयित रुग्ण 24 ऑगस्टला समोर आला होता, त्यानंतर एक एक करून 6 मुलांचा मृत्यू झाला. बालकांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यात छिंदवाडा येथील 6 मुलांचा मृत्यू झालाय, चार व्हेंटिलेटरवर तर दोन रुग्ण सामान्य वॉर्डात उपचार घेत असल्याची माहिती शासकीय मेडिकल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी सांगितले. आता मृत मुलांचा आकडा 10 वर पोहोचला आहे.
एकूण 24 केसेस आल्या होत्या, त्यापैकी काही ठीक झाले, काही व्हेंटिलेटरवर आणि काही येथून दुसऱ्या रुग्णालयात गेले, काही पेशंट सध्या ट्रीटमेंट घेत आहेत. छिंदवाडाचे 14 पेशंट आले होते, मेंदूत इन्फेक्शन होते त्यात काही बरे होत आहेत. एकून 24 पैकी दहा रुग्णाचा मृत्यू झाला त्यापैकी सहा छिंदवाडा जिल्ह्यातील आहेत आणि चार व्हेंटिलेटरवर आहेत 2 ट्रीटमेंट घेत आहेत, असे डॉ अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय मेडिकल रुग्णालय यांनी म्हटले.
कफ सिरपमुळे मुलांचे मृत्यू होत असल्याचा दावा केला जात असतानाच एकच खळबळ उडालीये. काही भागांमध्ये थेट या औषधावर बंदी घालण्याचा देखील निर्णय घेण्यात आलाय. या औषधामुळे मुलांच्या किडण्या निकामी होत असल्याचे काही रिपोर्टमध्ये दिसतंय. मात्र, मुलांच्या मृत्यूचे गूढ कायम असून NIV रिपोर्ट येणे बाकी आहे, त्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल. खोकल्याच्या सिरप पुरवठा करणाऱ्यांची चौकशी देखील केली जात आहे. मृत बालकांचा आकडा थेट 10 वर पोहोचला आहे.