बुलेटच्या आवाजाने पाळीव कुत्रा भुंकला अन् वाद पेटला; माजी नगरसेवकपुत्राची तिघांना घरात घुसून मारहाण, धारदार शस्त्राने…

बुलेटच्या आवाजाने पाळीव कुत्रा भुंकल्याने वाद पेटला. त्यानंतर माजी नगरसेवकपुत्राने तिघांना घरात घुसून मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलेटच्या आवाजाने पाळीव कुत्रा भुंकला अन् वाद पेटला; माजी नगरसेवकपुत्राची तिघांना घरात घुसून मारहाण, धारदार शस्त्राने...
jalgaon crime
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 06, 2026 | 1:12 PM

जळगावमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाळीव कुत्रा भुंकल्याने माजी नगरसेवकपुत्राने तिघांना घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. जळगावच्या मेहरूण परिसरात मंगळवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. या हल्ल्यात घरातील महिला आणि मुले जखमी झाले आहेत. औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक पुत्रावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परेश पांडुरंग वंजारी यांचा कुत्रा हा माजी नगरसेवक ईकबाल पिरजादे याच्यावर भुंकला. कुत्रा भुंकल्याचा रागा इकबाला आला. त्यानंतर कुत्रा मालकाचा मुलगा सौरभ घरातून बाहेर आला. त्याने सौरभला शिवगीळ आणि दमदाटी केली. त्यानंतर वाद आणखी वाढला. पुढे ईकबाल पिरजादे , गाझी ईकबाल पिरजादे यांच्यासह इतर दोघांनी मिळून लाकडी दांडके आणि धारदार शस्त्र घेऊन कुत्रा मालकाला मारहाण केली. या मारहाणीत कुटुंबीय जखमी झाले. या हल्ल्यात महिलेचे मंगळसूत्र व मुलाची सोन्याची चेन, हातातील घड्याळाचं नुकसान झालं. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

नेमकं काय घडलं?

बुलेटचा आवाज ऐकून पाळीव कूत्रा भूकंत मागे पळाल्याचा राग माजी नगरसेवकपुत्र ईकबालला आला. त्यामुळे माजी नगरसेवकपुत्राने कुत्रा मालक आणि त्याच्या मुलाला मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकपुत्र पिरजादेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. माजी नगरसेवकपुत्राने उद्योजकांसह त्याचा मुलगा, पत्नी, कार ड्रायव्हर अशा चौघांना मारहाण केली, यादरम्यान उद्योजकावर चाकूने देखील वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तरुणीचा छळ करून विनयभंग 

जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनच्या शेजारी मानसिंह मार्केट परिसरात तरुणीचा छळ केला. त्यानंतर विनयभंग केल्याची केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपीने मोबाईलमधील फोटो व्हायरल धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग फोटो व्हायरलची धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us