AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुत्रा जेव्हा तुमच्याकडे पाहतो, त्यावेळी त्याच्या डोक्यात काय चालतं?, शास्त्रज्ञांनी शोधलं…

Dog Psychology: मानवी चेहऱ्यावरील आनंद, राग, भीती आणि दुःख या मानवीय भावनांवर कुत्र्याच्या मेंदूची प्रतिक्रियाही बदलते. कुत्रा आपल्याकडे एकटक पाहतो, त्यावेळी त्याच्या डोक्यात काय चालतं? शास्त्रज्ञांनी त्यावर उत्तर शोधलं आहे. काय आहे याविषयीचे संशोधन?

कुत्रा जेव्हा तुमच्याकडे पाहतो, त्यावेळी त्याच्या डोक्यात काय चालतं?, शास्त्रज्ञांनी शोधलं...
कुत्रा जेव्हा तुमच्याकडे पाहतो, त्यावेळी त्याच्या डोक्यात काय चालतं?, शास्त्रज्ञांनी शोधलं...Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 16, 2026 | 4:48 PM
Share

आपला कुत्रा फार इमानी आहे. त्याला आपल्या मनातील अचूक कळतं. आपल्या चेहऱ्याचे हावभाव तो ओळखतो. आपण दुःखी असलो की तो समजतो. आपल्या कुत्र्याला आपली अस्वस्थता जाणवते असे अनेक कुत्रा मालकांना वाटते. पण खरंच असं असतं का? मानवी चेहरा कुत्रा वाचतो का? मानवाचे दुःख, भीती, राग, आनंद या भावनांनुसार तो प्रतिक्रिया देतो. त्याची प्रतिक्रिया बोलकी नसली तरी आपल्या मनाची घालमेल त्याला जाणवते असा आपला जो समज आहे, त्यावर एक संशोधन समोर आले आहे. 10 ऑगस्ट रोजी iScience च्या सेल प्रेसच्या जर्नलमध्ये एक नवीन संशोधन प्रकाशित झाले आहे. मानवी चेहऱ्यावरील आनंद, राग, भीती आणि दुःख या मानवीय भावनांवर कुत्र्याच्या मेंदूची प्रतिक्रियाही बदलते, असा या संशोधनाचा घोषवारा आहे.

असे झाले संशोधन

संशोधकांनी पाळीव कुत्र्यांचा मेंदू स्कॅन केला. कुंत्र्यांना वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी मानवी चेहरे दाखवले गेले. अर्थात छायाचित्र दाखवली गेली. कुत्रांनी मानवी चेहऱ्यावरील हावभावानुसार काय प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मेंदूमध्ये काय सक्रियता दिसली, हे टिपण्यात आले. तेव्हा संशोधकांना धक्काच बसला. कारण कुत्रा हा केवळ चांगला अथवा वाईट इतकेच वर्गीकरण करत नाही. यापूर्वीच्या संशोधनात कुत्रा आनंदी चेहरा आणि दुःखी, नकारात्मक चेहरा ओळखू शकतो. त्यातील फरक समजू शकतो हे दिसून आले होते. आताच्या संशोधनातून मानवीय भावना विशेषतः राग, भीती आणि दुःख यांची सरमिसळही त्याला जाणवते आणि त्याच्या मेंदूवरही त्याचा परिणाम होतो असे संशोधनातून समोर आले आहे.

संशोधनातून काय आढळले?

घाबरलेल्या चेहऱ्याकंडे पाहताना, रागावलेल्या, कष्टी चेहऱ्यांकडे पाहताना आणि हसऱ्या चेहऱ्यांकडे पाहताना कुत्र्याच्या मेंदूमध्ये दिसलेली सक्रियता वेगवेगळी होती. याचा अर्थ या सर्व भावभावनांमध्ये कुत्रे फरक करु शकतात. ते केवळ सकारात्मक आणि नकारात्मक इतकाच मर्यादीत भेद करत नाहीत. तर त्यांना मानवी भाव-भावनांची जाणीव होते. त्यांना मानवी भावनाही कळतात असा शास्त्रत्रांचा दावा यामाध्यमातून समोर आला आहे.

मालकाची घालमेल कुत्रा ओळखतो

संशोधक राऊल हर्नांडेझ-पेरेझ आण लॉरा कुआया यांनी न्यूजवीकला या संशोधनाची माहिती दिली. त्यांच्या मते, कुत्र्यांमध्ये मानवी भावना ओळखण्याचीच नाही तर त्या भावनांमध्ये फरक करण्याची क्षमता असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. आनंदी चेहरा, दुःखी चेहरा इतकेच ते ओळखत नाही. तर मालकाच्या मनातील घालमेल, त्याच्या चिंता, त्याची मनस्थिती याचा अचूक वेध कुत्रा घेऊ शकतो. त्याला अबोल भाषाही मालकाच्या चेहऱ्यावरून समजते, हे या संशोधनातून समोर आले आहे. मानवाच्या भीतीशी संबंधित संकेत कुत्रे हे वेगवेगळ्या संवेदनांमधून टिपतात. इतकेच नाही तर मानवी चेहऱ्यावरील सुक्ष्म बदल ओळखण्यातही कुत्रे माहीर असतात यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हे मोठे संशोधन म्हणावे लागेल.

कुत्र्यांच्या मेंदूचा अभ्यास करून मानवांशी असलेली त्यांची विलक्षण सामाजिक आणि भावनिक समज या संशोधनातून समोर आली आहे. गेल्या कित्येक हजार वर्षात कुत्र्याचा मानवी वस्तीसोबत अव्याहत प्रवास सुरू आहे. या इतक्या वर्षाच्या काळात मानवी पिढ्यांसोबत कुत्र्यांच्या पिढ्याही उन्नत झाल्या आहेत. त्यांना मानवी स्वभावाचे गुण हेरता येतात हे या संशोधनातून समोर आले आहे. मानवाचा एक चांगला मित्र म्हणूनही कुत्रा ओळखल्या जातो. अनेकांच्या घरात कुत्रे असतात. अनेक मालकांचा पाळीव कुत्र्यांवर जीव असतो. व्हिडिओ कॉलवर सुद्धा ते प्रतिक्रिया नोंदवतात. या नवीन संशोधनातून मानवी चेहऱ्यावरील सुक्ष्म बदलच नाही तर मनाची घालमेल ओळखण्यात कुत्रे पारंगत असल्याचे समोर आले आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...