राष्ट्रवादीचे नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेत गर्दी, तिघा मुलांवर गुन्हा

राष्ट्रवादीचे नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेत गर्दी, तिघा मुलांवर गुन्हा
हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ते राज्याच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हाजी गफ्फार मलिक यांचा राष्ट्रवादीतील प्रवास आहे. (Jalgaon NCP Haji Gaffar Malik funeral)

अनिश बेंद्रे

|

May 27, 2021 | 4:06 PM

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलिक (Haji Gaffar Malik) यांच्या अंत्ययात्रेत उसळलेल्या गर्दी प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन दिवसांनी हा गुन्हा दाखल झाला. (Jalgaon NCP Leader Haji Gaffar Malik funeral mob FIR registered)

अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी

हाजी गफ्फार मलिक यांचे 24 मे रोजी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर 25 मे रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. त्यात गफ्फार मलिक यांचे पुत्र एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, फैजल अब्दुल गफ्फार मलिक यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस नाईक गिरीश पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

कोण होते अब्दुल गफ्फार मलिक?

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ते राज्याच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हाजी गफ्फार मलिक यांचा राष्ट्रवादीतील प्रवास आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरुन रावेर विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या काही मतांच्या फरकामुळे त्यांचा पराभव झाला होता.

पडत्या काळात राष्ट्रवादीला साथ

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अग्रेसर राहण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असून पक्षवाढी करीता त्यांनी परिश्रम घेतले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षात ख्याती होती. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात मलिक यांना अनेक पक्षातून बोलावणं आलं होतं. मात्र त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीसोबत निष्ठा राखली.

शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्य प्रमुख डॉ. हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांचे निधन दुःखदायक आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालिम-ए-अंजुमन आणि इकरासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम युवक-युवतींच्या उच्च शिक्षणासाठी आणि औद्योगिक प्रशिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले. राजकीय क्षेत्रातील संयत तरीही आग्रही नेतृत्व त्यांच्या जाण्याने हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना आणि भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

संबंधित बातम्या : 

राजकारणातील संयत नेतृत्व हरपले, निष्ठावान सहकाऱ्याच्या निधनाने पवार हळहळले

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते करण म्हेत्रेंच्या अंत्ययात्रेला गर्दी, दोनशेहून अधिक समर्थकांवर गुन्हा

पुण्यात गुन्हेगाराची हत्या, अंत्ययात्रेला शेकडो बाईक्सची रॅली, 80 समर्थक ताब्यात

(Jalgaon NCP Leader Haji Gaffar Malik funeral mob FIR registered)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें