Video | खडसेंच्या भाषणात बत्तीगुल्ल, अंधारात मोबाइल चमकले, अन् घोषणा एकच….

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर करण्याचं काम मी केलं. पण आता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे इथलं पक्ष संघटन मीच वाढवणार. या जिल्ह्यात 100 टक्के यश मिळवून देणार, असा विश्वास एकनाथ खडसेंनी व्यक्त केला.

Video | खडसेंच्या भाषणात बत्तीगुल्ल, अंधारात मोबाइल चमकले, अन् घोषणा एकच....
| Updated on: Sep 15, 2022 | 5:24 PM

जळगावः जळगावात आज राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) मेळावा पार पडला. अजित पवाराचं (Ajit Pawar) दिमाखदार भाषण आणि नाथाभाऊंच्या (Eknath Khadse) शैलीने हा कार्यक्रम दणाणून सोडला. या मेळाव्यातील आणखी एका घटनेची सध्या जळगावात जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्या आधी एकनाथ खडसेंचं भाषण सुरु होतं. यावेळी अचानक वीजपुरवठा खंडीत झाला. भर सभेत अंधार झाला. पण प्रत्येकाजवळ मोबाइलरुपी बॅटऱ्या असल्याने काही क्षण मोबाइलचे लाइट झळकवण्यात आले. एवढ्यात कार्यकर्त्यांमधून जोरजोरात घोषणाबाजी सुरु झाली. एकच वादा… अजित दादा… काही वेळातच वीज पुरवठा खंडित झाला. मात्र या प्रसंगाची चर्चा जळगावात सुरु आहे. हा व्हिडिओदेखील व्हायरल केला जातोय…

पहा व्हिडिओ—

‘जळगावात राष्ट्रवादी मजबूत करणार’

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर करण्याचं काम मी केलं. पण आता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे इथलं पक्ष संघटन मीच वाढवणार. या जिल्ह्यात 100 टक्के यश मिळवून देणार, असा विश्वास एकनाथ खडसेंनी व्यक्त केला. मुक्ताईनगरमध्ये निवडून आणलेला आमदार आपलाही झाला नाही आणि उद्धवजींचाही झाला नाही. खोके देऊन ओके झाला. यावेळी आपणच त्याला निवडून आणलं होतं… असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला.

अजित पवार काय म्हणाले पहा?

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.