Jalgaon Gold Silver : सुवर्णनगरीत सोने कडाडले! एकाच दिवसात एक हजारांची भरारी, इतका आहे भाव

| Updated on: May 04, 2023 | 7:20 PM

Jalgaon Gold Silver : सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याचा भाव कडाडला आहे. एकाच दिवशी किंमतींमध्ये एक हजारांची वाढ झाली. सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली आहे.

Jalgaon Gold Silver : सुवर्णनगरीत सोने कडाडले! एकाच दिवसात एक हजारांची भरारी, इतका आहे भाव
सोन्याची हनुमान उडी
Follow us on

जळगाव : संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात (Jalgaon Sarafa Market) सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठलाय. गुरुवारी सकाळी सराफ बाजारात व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर सोन्याने जोरदार उसळी नोंदवली. सोन्याच्या भावात एकाच दिवशी तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली. सोन्याचे भाव कडाडले असले तरी सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र आहे. सध्या लग्नसराईची धूम आहे. त्यामुळे सराफा बाजारात तुफान गर्दी आहे. दरवाढीमुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत सोने अजून वधारण्याची शक्यता आहे.

इतकी झाली वाढ
सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह 63 हजार 500 रुपये प्रति तोळा इतके नोंदवले गेले. गेल्या 24 तासात हे दर 1 हजार रुपयांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत. सध्या लग्न सराईची धामधूम सुरू आहे. त्यामुळे जळगावच्या सराफ बाजारात सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. मात्र सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

हे सुद्धा वाचा

BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

अशी तपासा शुद्धता

  1. हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.
  2. त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
  3. सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
  4. हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
  5. 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
  6. 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
  7. 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
  8. 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते