शांतता कमिटीचे सदस्य उभे राहतात, दोन नंबरवाले खुर्चीवर बसतात; भाजप आमदार सुरेश भोळेंची खंत

| Updated on: Nov 14, 2021 | 5:19 PM

यावेळी जिल्ह्यातील शांतता अबाधित रहावी यावर चर्चा झाली. तसेच चर्चा करताना काही मुद्देही पुढे आले. यावेळी बोलताना आमदार सुरेश भोळे यांनी शांतता कमिटी सदस्यांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले केवळ अशांतता निर्माण झाली म्हणून सदस्यांना बोलाविले जाते. त्यांना मान दिला जातो. हे कायम झाले पाहिजे.

शांतता कमिटीचे सदस्य उभे राहतात, दोन नंबरवाले खुर्चीवर बसतात; भाजप आमदार सुरेश भोळेंची खंत
शांतता कमिटीचे सदस्य उभे राहतात, दोन नंबरवाले खुर्चीवर बसतात
Follow us on

जळगाव : दंगल, अशांतता झाली की पोलिसांना शांतता कमिटीच्या सदस्यांची आठवण होते. इतर वेळी मात्र पोलीस स्टेशनला शांतता कमेटीचे सदस्य उभे राहतात आणि दोन नंबर धंदेवाले खुर्चीवर आदराने बसविले जातात अशी खंत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव येथे शांतता कमिटी बैठकीत व्यक्त केली. मालेगाव, अमरावती, नांदेड येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे तसेच आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन आदी उपस्थित होते.

शांतता कमिटी सदस्यांना मान कायम ठेवावा

यावेळी जिल्ह्यातील शांतता अबाधित रहावी यावर चर्चा झाली. तसेच चर्चा करताना काही मुद्देही पुढे आले. यावेळी बोलताना आमदार सुरेश भोळे यांनी शांतता कमिटी सदस्यांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले केवळ अशांतता निर्माण झाली म्हणून सदस्यांना बोलाविले जाते. त्यांना मान दिला जातो. हे कायम झाले पाहिजे. इतर वेळी मात्र शांतता कमेटीचे सदस्य पोलीस स्टेशनला उभे राहतात आणि पोलीस दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना आदराने खुर्चीवर बसवतात, हे चित्र बरोबर नाही. सदस्यांना आदराने वागवावे असे आदेश प्रत्येक पोलीस स्टेशनला दिले जावे, असे मतही आमदार भोळे यांनी व्यक्त केले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनीही सट्टा, पत्ते या ठिकाणी होणाऱ्या किरकोळ वादातून दंगली होतात. त्यामुळे ते बंद कराव्यात अशी मागणी केली केली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी जिल्ह्यात शांतता कायम रहावी यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

दोन दिवसांपूर्वी राज्यात उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बैठक

त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या मोर्च्याला हिंसक वळण लागले. जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांकडूनही प्रत्युत्तरात सौम्य लाठीचार करण्यात आला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूराचाही वापर करण्यात आला. मालेगाव, अमरावती, नांदेड, भिवंडी, परभणी आदि ठिकाणी दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती. तर अमरावती दुसऱ्या दिवशीही परिस्थिती जैसे थे होती. अखेर अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. येथील परिस्थिती पाहता जळगाव येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जळगावमध्ये पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे, भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर जयक्षी महाजन यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. (BJP MLA Suresh Bhole’s reaction to the police peace committee)

इतर बातम्या

2014 नंतर काय मिळालं?, पेट्रोल महंगा, गॅस महंगा… छगन भुजबळांनी उडवली कंगनाच्या विधानाची खिल्ली

VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन