लाडक्या बहिणीला उपमुख्यमंत्र्यांचा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी सोबत विमानाने मुंबईत आणले

Eknath Shinde : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कॉमन मॅनचे पुन्हा एकदा दर्शन झाले. शिंदे यांच्यातील माणुसकीने राजकीय बडेजावपणा आणि प्रोटोकॉलला दूर केले आणि एका लाडक्या बहिणीला मोठी मदत झाली.

लाडक्या बहिणीला उपमुख्यमंत्र्यांचा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी सोबत विमानाने मुंबईत आणले
एकनाथ शिंदे आले देवासारखे धावून
Image Credit source: फाईल चित्र, गुगल
| Updated on: Jun 07, 2025 | 8:44 AM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जमिनीवरील नेते म्हणून प्रसिद्ध आहेतच. त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन अनेकांनी अनुभवले आहे. मदतीला धावून जाणे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. हभप मोरे महाराज यांच्या कुटुंबियांना मदत असो की काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढणे असो, शिंदे जातीने हजर होते. त्यांची यंत्रणा पण याकामी दक्ष असतेच. त्यातच काल शिंदे हे जळगाव दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांच्यातील कॉमन मॅनचे पुन्हा एकदा सर्वांना दर्शन झाले. त्यांनी लाडक्या बहिणीला आधारच दिला नाही तर विमानाने सोबत मुंबईला आणले.

किडनीग्रस्त भगिणीला मदत

किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबई निघालेल्या जळगावच्या रुग्ण महिलेला स्वत:च्या विमानात घेऊन जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉमन मॅनचे दर्शन घडवलं. शितल बोरडे असं रुग्ण महिलेचे नाव असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या विमानात बसवत तिला मुंबईला आणलं. किडनी उपलब्ध झाल्यामुळे तातडीने रुग्ण महिला मुंबईला जाण्यासाठी निघाली होती. मात्र विमान निघून गेल्यामुळे जाण्यास अडचण येत होती, वेळेत पोहोचणं महत्त्वाचे होते. मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली

भाऊराया मदतीला धावला

त्यानंतर कुठलीही सबब न देता. आधीच उशीर झाला असताना सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्ण महिलेची विचारपूस करत तिला स्वत:च्या विमानात जागा उपलब्ध करून मुंबईला आणलं. विशेष म्हणजे मुंबईला उचलल्यानंतर रुग्णालया पर्यंत या महिलेला रुग्णवाहिका सुद्धा तयार ठेवण्यात आली होती.

एकनाथ शिंदे देवासारखे आले धावून

गेल्या आठ वर्षांपासून किडनीच्या आजाराने बहीण त्रस्त आहे त्यामुळे ती किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतिक्षेत होती, आज अखेर किडनी उपलब्ध झाल्याबद्दल तातडीचा फोन आला त्यानुसार ती निघाली मात्र उशीर झाल्यामुळे विमान निघून गेले. दुसरी व्यवस्था नसल्याने मुंबईला वेळेत पोहोचणे अशक्य होतं मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवासारखे धावून आले. या शब्दात रुग्ण महिलेचा भाऊ जितेंद्र पाटील याने एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आभार मानले आहेत. या घटनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॉमन मॅन असल्याचा प्रत्यय आल्याच मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना सांगितलं.