Gulbrao Patil: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो… विधान परिषदेत बंडखोरी, तरी गुलाबराव पाटलांची कळी कशी खुलली?

Gublbrao Patil on Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद तिकीट वाटपावेळी महायुतीच्या नेत्यांमधील वाद उफाळून आला. त्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा मोर्चा सांभाळला. चार-पाच जागा दिल्या, त्यातही भाजपने बंडखोरी केल्याची तोफ त्यांनी डागली. पण आता त्यांचा एकाएक सूर आणि नूर पालटला आहे.

Gulbrao Patil: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो… विधान परिषदेत बंडखोरी, तरी गुलाबराव पाटलांची कळी कशी खुलली?
गुलाबराव पाटील
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 12:23 PM

किशोर पाटील, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना आणि मित्रपक्ष भाजपातील खडाजंगी उभ्या महाराष्ट्राने पाहिली. अब्दुल सत्तार, संजय गायकवाड पार दूर पूर्व विदर्भातील आमदार नरेंद्र बोंडेकर ते मंत्री गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत सर्वांनीच भाजपची उणीदुणी काढली. भाजप मित्रपक्षालाच संपवत असल्याचा खास दारूगोळाही बाहेर आला. महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला चार-पाच जागा हाती आल्या. त्यातही भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी (Gublbrao Patil on Vidhan Parishad Election 2026) केली अशी नाराजी गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या मुलाला उमेदवारी न मिळाल्याचे शल्यही त्यांच्या मनात आहे.  पण कालच्या सभेत त्यांची कळी खुललेली दिसली. शा‍ब्दिक गोटामारीत त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. चिमटे काढण्यात आणि शेरोशायरीतून खणखणीत इशारा देण्यात गुलाबराव माहिर मानले जातात. सध्या गुलाबरावांचा सूर आणि नूर अचानक का बदलला, त्यांची कळी कशी खुलली याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

विधान परिषदेत बंडखोरी… गुलाबराव पाटील इतके निश्चिंत कसे?

गेल्या तीस वर्षांपासून सभा घेत आहे. पूर्वी मी ओट्यावर सभा घ्यायचो. दरवर्षी आपल्याला काय करायचा आहे सध्या काय करावं समजत नाही आहे ? कमी पाऊस पडेल असं महाराष्ट्रात चित्र निर्माण झालाय आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात 460 किलोमीटरचे नाल्याचा काम सीएसआर मधून काम सुरू केलेलं आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी मलाविचारलं तू हे कसं काम करत असतो? देणाऱ्यांचे हात हजार आहेत, असे पाटील म्हणाले. मी एक फकीर माणूस होतो मला गुलाबराव करण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी इथं सभा घेतली होती. मतदार संघात शिवसेना टिकवण्याचं काम आम्ही केलेले आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे जे सांगतील तेच होईल

नशीब मैं होगा तो चल कर आएगा. नशीबमें नही होगा तो आकर चला जाएगा, इतना सिरियसली नही लेना का? जिंदगी इतनी खराब होती तो लोगो को हम रूला के नही जाता. मी तुम्हाला मंत्री वाटतो का ? जळगाव ग्रामीण मध्ये कुणी माय का लाल नाही जो आपल्याला धक्का लावू शकतो. विधानपरिषदेवर काय बोलणार यासाठी अनेक जण या सभेत आली आहेत. मेरा बॉस ठाणे में आहे, जो बोलेगे वही होगा, असे मोठे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव विधानपरिषदेचा जागा न मिळाल्यामुळे नाराजी

शेरोशायरी मधून मुलाला उमेदवारी न मिळाल्याची मंत्री गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त केली. माझी मुल माझ्यापेक्षा चांगली आहेत. कार्यकर्ता माझा जीव आणि प्राण आहे. कार्यकर्त्याची गाडी फसली की त्यांचा भाऊ त्यांच्यासोबत राहतो. मी माझ्या कार्यकर्त्यावर मी संकट पाहू शकतं नाही. पाणी वाहत ठेवलं पाहिजे डास आणि डेंगू होत नाही. पाणी साठवून डास आणि मच्छर होतो डेंगू होवून माणूस साफ होतो, असा टोलाही त्यांनी लगावला. आपण सगळ्यांनी आशीर्वादाच्या भरोश्यावर आपण काम केलं पाहिजे. गुलाबराव पाटलांचा सात वर्षे पालकमंत्री राहण्याचा मान मिळाला आहे. तुमच्याकडे सोन्यासारखी माणसं आहेत. माझ्याकडे तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं आहेत, जमिनीवर माणसाला वाकावं लागतं. वडाचा झाडं मोठं झालं की त्यांच्या पारंब्या जमिनीला लागतात. मी वाकून आणि झुकून चालणार आहे. मी 58 पुर्ण केलेलं आहे 60 नंतर सिनिअर सिटीझन होतो. बाप तो बाप होता है. पुढच्या काळात सगळ्याच्या आशीर्वाद बाप बाप होतो है ध्यान में रखो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो

या गावाचा मी गुलाब होतो मात्र याला गुलाबराव करण्याचं काम कोणी केला असेल तर ते म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. मी तुमच्या भरोशावर राजकारण करतो. तुम्ही मला मुंबईला पाठवला आहे. जळगाव विधान परिषदेमध्ये बंडखोरी झाले काय होणार. हेच ऐकायला पत्रकार मोठ्या संख्येने आले आहेत. पण माझा बॉस ठाण्यात बसला आहे. ते जे सांगतील तेच होईल, असे मोठे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले.

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो असं माझं स्वभाव आहे. कार्यकर्ता माझा प्राण आहे कार्यकर्ता माझा जीव आहे. कार्यकर्त्याची गाडी कोणती पकडली तर गुलाबराव त्यांच्या पाठीशी उभा राहतो हे कार्यकर्त्याला माहिती आहे.. देवा तू सर्व काही कर पण मला आणि माझ्या कुटुंबाला कधी गर्व येऊ देऊ नको. कार्यकर्ता हीच माझी संपत्ती आहे. त्यामुळे कार्यकर्त्याच्या डोळ्यात कधीच अश्रू पाहू शकत नाही. आणि वेळ आली तर मी काही करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Follow Us