
काही दिवसांपूर्वी जळगावच्या प्रसिद्ध गौताळ अभयारण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांना मुंडके नसलेला अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे जवळगावमध्ये सर्वत्र खळबळ माजली. पोलिसांनी तपास केल्यानंतर 24 तासाच्या आत मुंडके देखील शोधून काढले. त्यानंतर दातांना लावलेल्या क्लिप्समुळे हा मृतदेह कोणाचा आहे याचा तपास करण्यात पोलिसांना यश मिळाले. आता नेमकं प्रकरण काय? चला जाणून घेऊया…
नेमकं काय घडलं?
गौताळा अभयारण्यामध्ये, सनसेट पॉइंटजवळ घनदाट जंगलात 3 सप्टेंबर रोजी कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना मुंडके नसलेला मृतदेह सापडला होता. त्यानंतर आजूबाजूला तपास केल्यानंतर त्यांना डोकेही सापडले. कवटीवरील “जॉ फॅक्चर क्लिप”वरून पोलिसांनी तपास केला. त्यांना या आधारावर हा मृतदेह निखिल हिरामण सूर्यवंशी (रा. शिंदी, ता. चाळीसगाव) या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. आता पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले चला जाणून घेऊया…
वाचा: गोरेगावमधील धक्कादायक प्रकार! आईला आवडला लेकीची BF, घरात चोरी झाली अन्… नेमकं प्रकरण काय?
तरुणाच्या मित्रावरच पोलिसांचा संशय
सापडलेला मृतदेह हा निखिलचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याचे मित्र, कुटुंबीय आणि आजूबाजूच्या लोकांची तपासणी सुरु केली. सर्वजण चौकशीसाठी आले. पण निखिलचा एकदम जवळचा मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर याच्या वागण्यावरून पोलिसांना संशय आहे. तो चौकशीसाठी येण्यास टाळाटाळ करत होता. पोलिसांनी श्रावणवर जवळपास आठ दिवस गुपचूप लक्ष ठेवले. त्याचे वागणे संशयास्पद होते. शेवटी चौकशीमध्ये श्रावणने गुन्हाची कबुली दिली.
नेमका खून कसा केला?
श्रावणने निखिलचा खून केल्याचे मान्य केले आणि हे सगळं कसे घडवून आणले हे सविस्तर सांगितले. 26ऑगस्ट रोजी श्रावण निखिलला भेटायला गेला. मैत्रिणीला भेटायला जायचे आहे असा बहाना करत श्रावण त्याला सायगाव मार्गे गौताळा अभयारण्यातील सनसेट पॉइंटपर्यंत घेऊन गेला. त्याठिकाणी “मी चोऱ्या गुंडगिरी व्यसन करतो तुला माझे सर्व कुकर्म माहीत असून तू माझ्या गुन्ह्यांची माहिती ठेवतोस, त्यामुळे माझी बदनामी होत असून तू मेला तरच माझे लग्न होईल. त्यामुळे आज तुझा खूनच करायचा आहे,” असे म्हणत निखिलने श्रावणवर कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रावणने वार चुकवत निखिलच्या गुप्तांगावर लाथ मारली आणि तो खाली पडताच श्रावणने त्याच कुऱ्हाडीने निखिलचे शीर धडापासून वेगळे केले. मित्रानेच मित्राचा खून केल्याचे समोर आल्यानंतर शिंदीसह संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.