Eknath Khadse: “दूधसंघात एक रुपयाचाही गैरव्यवहार नाही, मला बदनाम करण्याचं कारस्थान”, एकनाथ खडसेंचा खुलासा

| Updated on: Aug 21, 2022 | 3:45 PM

दूधसंघात एक रुपयाचाही गैरव्यवहार नाही. मला बदनाम करण्यासाठी सगळं कारस्थान रचलं जातयं,असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.

Eknath Khadse: दूधसंघात एक रुपयाचाही गैरव्यवहार नाही, मला बदनाम करण्याचं कारस्थान, एकनाथ खडसेंचा खुलासा
एकनाथ खडसे
Image Credit source: TV9
Follow us on

जळगाव : जळगाव दूध संघाला (Jalgaon Dudh Sangh) बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. संचालक मंडळाला अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक हे उद्योग सुरु आहेत. दूधसंघात एक रुपयाचाही गैरव्यवहार नाही. मला बदनाम करण्यासाठी सगळं कारस्थान रचलं जातयं,असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. शिंदे सरकारच्या माध्यमातून, तसंच प्रशासन मंडळाच्या सहाय्याने जिल्हा दूध संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही एकनाथ खडसेंनी केला आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी दूध संघाचा कारभार पाहिला आहे. तो जास्तीत जास्त पारदर्शी पध्दतीने करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने केला असल्याचे, कारभारावर माझं स्वत:चं लक्ष होतं, असंही यावेळी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितलंय. दूधसंघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांकडून लावण्यात येत आहे. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावर होणाऱ्या आरोपांचं खंडण केलं.

जिल्हा दूध संघाच्या कारभारात अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि त्यांचे संचालक मंडळाने गैरव्यवहार केल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचाऱ्याने शासनाकडे केली होती. त्या तक्रारीवरुन शिंदे सरकारकडून चौकशी समिती देखील समिती देखील नियुक्त करण्यात आली होती. दरम्यान चौकशीत दहा कोटी रुपयांचा निधी शासनाची कुठलीही परवानगी न घेता संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत उघड झाल्याने संचालक मंडळ विरुद्ध कारवाई करण्याचे शासनाचे उपसचिव नि.भा. मराळे यांनी विभागीय सह निबंधकांना दिले आहे.

यापूर्वीही विरोधकांनी जिल्हा बँकेत खोदून खोदून पाहिलं, मात्र याठिकाणी भ्रष्टाचार आढळून आला नाही, असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले. जिल्हा दूध संघात एक रुपयांचाही गैरव्यवहार नाही, तुम्हाला शोधायच ते शोधा, जे खोदायच असेल ते खोदा मात्र काहीही सापडणार नाही, तुम्ही स्वत: तुमच्या तोंडावर आपटाल, शोधा किती शोधायचे ते, बदनाम करा किती करायचे ते करा, असं म्हणत एकनाथ खडसेंनी विरोधकांना इशारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

जिल्हा दूध संघावर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक मंडळावरही एकनाथ खडसेंनी निशाना साधला आहे, प्रशासक मंडळातील सदस्यांपैकी निम्मे सदस्य यांचा कुठलाही डेअरीचे सदस्य, दूधाची काही संबंध नाही, मात्र निव्वल मला व माझ्या संचालक मंडळाला बदनाम करण्याचं कटकारस्थान याठिकाणी चालंल आहे, असा आरोपही एकनाथ खडसेंनी केला. कुणीही यावं, तपासणी करावी, दोषी असेल तर शासन शिक्षा करेन, असं खुलं आव्हान एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिलं.