सुषमा अंधारे के. पी. प्राईड हॉटेलमध्ये नजरकैदेत, साध्या वेशातील पोलीस हॉटेलबाहेर तैनात

| Updated on: Nov 04, 2022 | 7:36 PM

गुलाबराव पाटील बिथरलेले आहेत. गुलाबराव पाटील अस्वस्थ झालेले आहेत.

सुषमा अंधारे के. पी. प्राईड हॉटेलमध्ये नजरकैदेत, साध्या वेशातील पोलीस हॉटेलबाहेर तैनात
सुषमा अंधारे
Image Credit source: tv 9
Follow us on

जळगाव : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना पोलिसांनी हॉटेल के. पी. प्राईडमध्ये नजरकैद केलंय. मुक्ताईनगर येथे महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतरही सभा घेणारच, असा पवित्रा ठाकरे गटाने घेतला. जळगाववरून मुक्ताईनगरकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी सुषमा अंधारे यांना नजरकैद केले. साध्या वेशातील पोलीस व महिला पोलिसांकडून सुषमा अंधारे नजर कैदेत आहेत.

यानंतर सुषमा अंधारे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, पोलिसांचा आक्षेप हा माझ्यावर नाही. महाप्रोबधन यात्रेत एकही असंसदीय शब्द आम्ही वापरला नाही. गुलाबराव पाटील या सभांना पाहून घाबरलेत. येवढाच त्याचा अर्थ निघतोय. गुलाबराव पाटील बिथरलेले आहेत. गुलाबराव पाटील अस्वस्थ झालेले आहेत.

आम्ही सांगितलं तर सभा रद्द करू शकतो. आमचा तेवढा दरारा आहे, असं गुलाबराव पाटील यांनी स्वतः सांगितलं. याचा अर्थ तुम्ही सत्तेचा गैरवापर करतोय. तुमचा तो दरारा, तुमची ती गुंडगिरी, हे पब्लिक डोमेनमध्ये सांगून ही सभा रद्द करता, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय.

सभांवरती बंदी घालणं हा गुलाबराव पाटील याचा अर्थ सभांना ते घाबरलेत, असा त्याचा अर्थ निघतो. सांगून सभा रद्द करत आहेत. तरीसुद्धा देवेंद्रजी आपण या सभेकडं दुर्लक्ष करत असाल तर आपण किती सत्तेसाठी आंधळे झालेले आहात.

गृहमंत्रपदाची शपथ घेताना मी कुणाचाही आकसभाव बाळगणार नाही. अधिकचं ममत्व बाळगणार नाही. अशी शपथ घेतली. ही शपथ तुम्ही विसरत आहात. तु्म्ही सत्ताधाऱ्यांची बाजू घेत आहात, असा आरोपही अंधारे यांनी केलाय.

बुद्धिभेद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. एखादा व्यक्ती बिधरला की काय बोलावं हे कळत नाही. काल परवा ते बाळ म्हणाले. आता ते पार्सल म्हणतात. त्यांनी ठरवावं मी काय आहे ते.