AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात पत्र्याच्या शेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने 5 मजुरांचा दबून मृत्यू

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा त्याखाली दबून मृत्यू झाला.

जालन्यात पत्र्याच्या शेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने 5 मजुरांचा दबून मृत्यू
वाळूचा टिप्पर खाली केल्याने 5 मजुरांचा दबून मृत्यू
| Updated on: Feb 22, 2025 | 9:18 AM
Share

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा त्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दैवी घटना असून काल मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यावर पुलाचं काम करणाऱ्या मजुरांवर काळाने घाला घातला.  या घटनेमध्ये पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 वर्षांच्या एका मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात मात्र यश आलं आहे. दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येत आहे.

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असून या पुलाचे काम करणारे मजूर पुलाशेजारीच पत्र्याची शेड बांधून राहत होते. काल रात्री ते मजूर मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच साडेतीनच्या सुमारास वाळूच्या एका टिप्परने त्यांच्या पत्र्याच्या शेडशेजारी वाळू रिकामी केली. मात्र गाढ झोपलेले ते मजूर वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि गुदमरल्यामुळे त्या मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र एक 13 वर्षांची मुलगी आणि एक महिला या दोघांनी कसेबसे वाचवण्यात स्थानिकांना यश मिळालं.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जाफरबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी या घटनेप्रकरणी तपास सुरू केला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान