AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bogus Doctors : आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, 103 डॉक्टरांकडे पदवी नसल्याचे उघड

महाराष्ट्रात अनेकदा ग्रामीण आणि झोपडपट्टी परिसरात बोगस डॉक्टर असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावरती वारंवार कारवाई सुद्धा केली जाते. परंतु बोगस डॉक्टरांची प्रकरण वाढतचं आहेत.

Bogus Doctors : आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, 103 डॉक्टरांकडे पदवी  नसल्याचे उघड
डॉक्टरImage Credit source: twitter
| Updated on: May 22, 2022 | 2:06 PM
Share

जालना – जालना (Jalna) जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा (Bogus Doctors) सुळसुळाट असल्याचे उघडकीस आले आहे. बेकायदेशीर काम करणाऱ्या डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या जिल्ह्यात बोगस डॉक्टर सापडल्याने अनेकांनी आश्चर्य़ व्यक्त केले आहे. छापेमारीत 103 बोगस डॉक्टर सापडले, तर नोंदणी नसलेले 166 वैद्यकीय व्यवसायी दुकान चालविताना आढळले आहेत अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

103 डॉक्टरांकडे पदवी नसल्याचे उघड

महाराष्ट्रात अनेकदा ग्रामीण आणि झोपडपट्टी परिसरात बोगस डॉक्टर असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावरती वारंवार कारवाई सुद्धा केली जाते. परंतु बोगस डॉक्टरांची प्रकरण वाढतचं आहेत. जालना जिल्ह्यात किमान 103 बोगस डॉक्टर कारवाई दरम्यान सापडले आहेत. त्यापैकी 166 नोंदणी नसलेले वैद्यकीय व्यवसायी बेकायदेशीरपणे दुकान चालवित असताना आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 433 डॉक्टर आहेत. त्यापैकी 267 नोंदणीकृत डॉक्टर आहेत. 166 डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंद नाही.तर 103 डॉक्टरांकडे वैद्यकीय पदवी नसल्याने त्यांना बोगस घोषित करण्यात आले आहे.

अंबडमध्ये 65 अनोंदणीकृत डॉक्टर आहेत

अंबडमध्ये 65 अनोंदणीकृत डॉक्टर आहेत, त्यानंतर मंठा येथे 46, परतूर 30, भोकरदन 13, जालना सात आणि घनसावंगी तालुक्यात चार डॉक्टर सापडले आहेत. तसेच बोगस डॉक्टर आणि नोंदणी नसलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांवर आरोग्य विभागाने कारवाई सुरू केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांनी सांगितले. टोपे यांनी यापूर्वीच जिल्ह्यातील बोगस डॉक्टर आणि बेकायदेशीर गर्भपात केंद्रांवर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले होते.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल सोनी यांनी आकस्मिक भेटी देऊन जालना तालुक्यातील 20 हून अधिक दवाखाने व रुग्णालयांची पाहणी केली.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.