AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : संभाजी नगर ते समान नागरी कायदा, राज ठाकरेंच्या मोदींकडे तीन विनंत्या

त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय सालं पोरकटपणा आहे कळत नाही. तुमचं खरं हिंदूत्व की आमचं खरं हिंदुत्व. काय वाशिंग पावडर आहे. तुम्हारी कमीजसे हमारी कमीज व्हाईट कैसी. लोकांना हिंदुत्वाच रिझल्ट पाहिजे.

Raj Thackeray : संभाजी नगर ते समान नागरी कायदा, राज ठाकरेंच्या मोदींकडे तीन विनंत्या
राज ठाकरेंच्या मोदींकडे तीन विनंत्याImage Credit source: facebook
| Updated on: May 22, 2022 | 1:42 PM
Share

पुणे : मोदींना (Narendra Modi) विनंती आहे की, समान नागरी कायदा आणावा असं मी म्हटलं होतं. लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन कायदा आणावा. औरंगाबादचं (Aurangabad) संभाजीनगर हे नामांतर लवकरात लवकर करा. यांचं एकदा राजकारण मोडितच काढा. यांच्या राजकारणासाठी हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला (MIM) मोठं केलं. एमआयएम सतत हिंदूच्या विरोधात बोलत आहे. त्यामुळे त्यांची रोजीरोटी चालू राहिल,. पण एक राक्षस वाढवतो हे याच्या लक्षात आलं नाही. म्हणता म्हणता त्यांचा खासदार झाला. या निजामाच्या औलादी इकडे वळवळ करायला लागल्या अशी टीका राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एमआयएमवरती केली. तुम्हारी कमीजसे हमारी कमीज व्हाईट कैसी

त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय सालं पोरकटपणा आहे कळत नाही. तुमचं खरं हिंदूत्व की आमचं खरं हिंदुत्व. काय वाशिंग पावडर आहे. तुम्हारी कमीजसे हमारी कमीज व्हाईट कैसी. लोकांना हिंदुत्वाच रिझल्ट पाहिजे. जे आम्ही देतो. महाराष्ट्रातील मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो. हे जे उत्तर प्रदेशचे बोलत आहेत. जेव्हा आंदोलन झालं होतं. 12 वर्ष झाली, रेल्वे भरती महाराष्ट्रात होती. तिकडून हजारो लोकं रेल्वे स्टेशनवर आली. मी फोटो पाहिला. महाराष्ट्रातील रेल्वे भरती महाराष्ट्रातील लोकांना माहीत नाही. पेपरला जाहिराती नाही. पण यूपी बिहारमध्ये जाहीराती होत्या अशी टीका राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली.

राज्यातील हजारो मुलांना नोकरी मिळाली

उद्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये भरती असेल तर त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या. त्यांंनी स्थानिक भाषेत परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील हजारो मुलांना नोकरी मिळाली. हे त्या आंदोलनाचं यश आहे. हे जे टिमक्या मिरवतात ना, राज ठाकरे अर्धवट सोडवतो. एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडतो. टोलनाक्याचं आंदोलन घेतलं. 70 टोलनाके बंद झाले. म्हणजे यांची काहीच जबाबदारी नाही. बाकीच्या पक्षाची जबाबदारी नाही. टोलवाले लुटतात. त्याचं काहीच नाही. बॉलिवूडमध्ये पाक कलाकार येत होते.

त्यांना देशातून हाकलून दिलं. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे असा टोला राज ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.