AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम रद्द करा नाहीतर परभणीत मोठा गोंधळ? वाहनही तयार, मनोज जरांगे पाटलांचा मोठा इशारा

Manoj Jarange Patil on Eknath Shinde: आज परभणीत दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकरी संवाद मेळावा होत आहे, त्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम रद्द करा नाहीतर परभणीत मोठा गोंधळ होण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम रद्द करा नाहीतर परभणीत मोठा गोंधळ? वाहनही तयार, मनोज जरांगे पाटलांचा मोठा इशारा
एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 11:41 AM
Share

मराठवाड्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. आज परभणीत दुपारून शिंदे यांचा शेतकरी संवाद मेळावा होत आहे. खासदार संजय जाधव यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप करत जरांगे यांनी हा कार्यक्रम लागलीच रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा परभणीत मोठा गोंधळ होण्याचा इशाराच त्यांनी दिला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नाहीतर मोठा गोंधळ

“बंडू जाधव मी तुम्हाला अजूनही व्यवस्थित भाषेत बोलत आहे. तुम्हाला वाटतं असेल की तुम्ही मोठे दादा वगैरे आहात. मंत्री शिरसाट यांचं ऐकून बंडू जाधव यांनी कार्यक्रम घेतला आहे. काय गरज आहे. त्यांना कार्यक्रम घ्यायची? मराठ्यांनी तुमच्यासाठी खस्ता खायच्या आणि तुम्ही कार्यक्रम आयोजित करायचा. मी कधीच कुणावर असं बोलेलो नाही. कार्यक्रम रद्द करा. अन्यथा मी परभणीत येईल. बंडू जाधव यांना राज्य अस्थिर करायचं आहे का? शिंदे यांना नांदेडपर्यंत जायचे आहे. विमानतळं तिथं आहे. शिरसाट यांच्या सांगण्यावरून तुम्ही हे कृत्य करता का? कशाला तुम्हाला आमच्या मतदारसंघात यायचं आहे? बंडू जाधव संपून जाईल. काय दिलं यांनी शेतकऱ्यांना? वाटोळं केलं यांनी शेतकऱ्यांचं. गोरगरिब मराठ्यांनी तुम्हाला निवडून आणलं. तुम्ही कुठंही गेलात त्याबद्दल आम्ही काहीही बोललो नाही. शिरसाट यांच्या सांगण्यावरून मराठा समाजाचे जात प्रमाणपत्र रद्द केले. मग आता हा दौरा कशासाठी? मी उपोषण सोडून कार्यक्रमस्थळी जाईल.” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यामुळेच एकच खळबळ उडाली आहे.

परभणीला जाण्यासाठी वाहन तयार

परभणीला जाण्यासाठी वाहन तयार आहे. मी बंडू जाधव यांना अजूनही व्यवस्थित भाषेत सांगत आहे. त्यांना दहा मिनिटात फोन करण्यासाठी सांगितले आहे. त्यांच्या उत्तराची वाट पाहणार आहे. त्यांना हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी सांगितले आहे. नाहीतर मी उपोषण सोडून कार्यक्रमस्थळी जाईल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. आता या कार्यक्रमाविषयी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परभणी येथे आज दुपारी एकनाथ शिंदे यांचा शेतकरी संवाद मेळावा

परभणी येथे आज दुपारी एकनाथ शिंदे यांचा शेतकरी संवाद मेळावा आहे. दुपारी एक वाजता एकनाथ यांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात होणार आहे. बॉम्ब स्कॉड पथकाकडून सभा स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुलाबांचा दीड क्विंटलचा हार स्टेज वर आहेत. पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे या कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम