‘आता फक्त लीड वाढला पाहिजे’, तिकीट कापलं, पण ‘हा’ भाजपा खासदार दुसऱ्या उमेदवारासाठी पॉझिटिव्ह

| Updated on: Mar 14, 2024 | 1:27 PM

Loksabha Election 2024 | "उमेदवार कमळ आहे, हे डोळ्यासमोर ठेवून काम करणार. मी भाग्यवान आहे, माझं वय 45 आहे, आणि या वयात मला आमदार, खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली" "मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत चार लाख 11 हजार मताधिक्यांनी मी निवडून आलो. हा एक विक्रम आहे"

आता फक्त लीड वाढला पाहिजे, तिकीट कापलं, पण हा भाजपा खासदार दुसऱ्या उमेदवारासाठी पॉझिटिव्ह
bjp
Follow us on

जळगाव | 14 मार्च 2024 (खेमचंद कुमावत) : “भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी माझी नेहमी भूमिका मांडली आहे. नेशन फस्ट, पार्टी सेकंड आणि त्यानंतर मी. कार्यकर्ता म्हणून विधानसभेत व लोकसभेत काम करण्याची संधी मला मिळाली. देशाच्या सर्वोच्च सभागृहात कामकाज करत असताना पहिल्या दहा खासदारांच्या यादीत मी आलो. पदाला न्याय देत असताना चांगलं काम केल्याचं समाधान मला आहे” असं भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील म्हणाले. “भारतीय जनता पार्टी एक वैचारिक पार्टी आहे. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला काम करायची संधी मिळाली आणि अजून पुढे भरपूर काम करायच आहे. मागच्या वेळेसदेखील मी पक्षाकडे खासदारकीची उमेदवारी मागितली नव्हती. स्मिता वाघ यांची उमेदवारी काढून मला उमेदवारी देण्यात आली” असं उन्मेष पाटील म्हणाले.

जळगाव लोकसभेचे भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं पक्षाने तिकीट कापलं आहे. तिकीट कापल्यानंतर पहिल्यांदाच उन्मेष पाटील यांनी टीव्ही नाईन मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. “पक्षाने निर्णय घेतला, मी लढलो. आता मी स्मिता वाघ यांच्यासोबत उभा राहणार. उमेदवार कमळ आहे, हे डोळ्यासमोर ठेवून काम करणार. मी भाग्यवान आहे, माझं वय 45 आहे, आणि या वयात मला आमदार, खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली” असं उन्मेष पाटील म्हणाले. “पक्षाने घेतलेला निर्णय योग्य आहे. पुढे भरपूर संधी आहे आणि पुढे अजून भरपूर काम करायच आहे. ही वेळ रुसायची, फुगायची नाही. राजकारण करत असताना माझा विचार सकारात्मक राहिला आहे” असं उन्मेष म्हणाले.

‘कोणी विरोधात काम केले, पक्ष सर्व जाणून आहे’

“विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. लोकसभा निवडणूक ही देशाची, राष्ट्राची आहे. 2019 ला माझ्या विरोधात कोणी काम केलं, याचा विचार न करता मी शिळ्या कढीला ऊत कधीच आणला नाही. अनेकांनी माझ्या विरोधात काम केले. 2019 ला जळगाव लोकसभेच्या निवडणुकीत चार लाख 11 हजार मताधिक्यांनी मी निवडून आलो. हा एक विक्रम आहे. कोणी विरोधात काम केले, पक्ष सर्व जाणून आहे, आणि योग्य वेळी पक्ष भूमिका घेईल. मी केलेल्या कामामुळे इच्छुकांची संख्या वाढली हेच माझ्या कामाचं प्रतीक आहे. भारतीय जनता पार्टीच संघटन वाढलं आहे. त्यामुळे फटका बसणार नाही, लीड वाढला पाहिजे, मतं वाढली पाहिजेत” असं उन्मेष पाटील म्हणाले.