AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं, पण कोणता महत्त्वाचा मुद्दा अजूनही बाकी? काय आहे नवीन डेडलाईन?

Manoj Jarange Big Demand: मराठा आरक्षणाच्या लढाईत अजून एका उपोषणाने खळबळ उडाली. काल मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे शस्त्र काढले आणि भर उन्हाळ्यात उपोषणही केले. सरकारने त्यांच्या 12 मुद्यांवर ड्राफ्ट काढला आणि त्यावर रात्री उशीरा शिक्कामोर्तब झाले. पण एका महत्त्वाच्या मुद्यावर अजूनही खल कायम आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं, पण कोणता महत्त्वाचा मुद्दा अजूनही बाकी? काय आहे नवीन डेडलाईन?
मनोज जरांगे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाडImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 31, 2026 | 11:31 AM
Share

Manoj Jarange on Satara Gazette: मराठा आरक्षणाच्या लढाईत अजून एका उपोषणाने राज्यात वातावरण तापले. रणरणत्या उन्हात मनोज जरांगेंनी खाटेवर आमरण उपोषण सुरू केले. सरकारने दोनदा शिष्टाईचा प्रयत्न केला. त्याला यश आले नाही. नंतर दिवसभर सरकार दरबारी मोठ्या घडामोडी घडल्या. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 12 महत्त्वाच्या मुद्यांचा ड्राफ्ट जरांगे पाटील यांच्याकडे सोपवला. त्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर जरांगेंनी शिक्कामोर्तब केले. पण एका मुद्यावर मात्र सरकारची आणि जरांगेंची सहमती होऊ शकली नाही. हा मुद्या पुन्हा लांबणीवर पडला. या मुद्यावर अजूनही खल सुरू आहे.

सातारा गॅझेटवर कल कायम

सातारा गॅझेट आणि कोल्हापूर गॅझेटविषयी मनोज जारंगे पाटील हे आग्रही आहेत. हैदराबाद गॅझेटच्या धरतीवर हे गॅझेट लागू करण्याची आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून या मुद्दांवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सातारा गॅझेट लागू करणे अवघड असल्याचे ते मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. त्यात काही कायदेशीर अडचणी असल्याने हा मुद्दा बाजूला ठेवण्यात आला आहे. काल रात्री जरांगेंच्या सर्व मागण्यांविषयी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीत दाखल झाले. फक्त सातारा संस्थानच्या गॅझेटचा मुद्दा राहिल्याचे विखे पाटील यांनी जरांगेंना सांगितले.

काय आहे सातारा गॅझेट?

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यावरून सातारा जिल्ह्यात वाद आहे. सातारा गॅझेटमध्ये मराठा समाजाच्या व्यक्तींच्या नोंदी या कुणबी म्हणूनच झाल्याचा दावा आहे. त्याआधारे ओबीसी आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. पण मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी मराठा आणि कुणबी या दोन जाती असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात मोठी अडचण आहे. त्यामुळेच हे गॅझेट लागलीच लागू करण्याची मागणी अडचणींची ठरत असल्याचे विखे पाटील यांचे म्हणणे होते. सातारा गॅझेटसंदर्भात आता एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात काय धोरण ठरते. पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यातील अडचण दूर होतील की नाही हे समोर येईल.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट