AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंनी उपोषण सोडताच मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया… सरकारच्या आश्वासनांवर फडणवीसांचे मोठे भाष्य…

Devendra Fadnavis First Reaction on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री आमरण उपोषण मागे घेतले. भर उन्हातील या उपोषणामुळे वातावरण तापले होते. दरम्यान या घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगेंनी उपोषण सोडताच मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया... सरकारच्या आश्वासनांवर फडणवीसांचे मोठे भाष्य...
मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 31, 2026 | 11:27 AM
Share

Devendra Fadnavis First Reaction on Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री आमरण उपोषण मागे घेतले. उपोषणावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. भर उन्हात त्यांच्या या आंदोलनाने राज्यात वातावरण तापले होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ठरली. सरकारने काही मागण्यांवर वेळ मागून घेतला. ते जरांगे यांनी मान्य केले. त्यानंतर या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांवरही मत व्यक्त केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. “जी आश्वासने दिली तुमच्यासमोर आहे. मागे काही नाही. ती त्यांनी वाचून दाखवली आहे. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनीही आश्वासने वाचून दाखवली आहेत. सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. त्यानुसार न्याय देण्याचं काम केलं आहे.” असे मुख्यमंत्री म्हणाले.

ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची काय भूमिका?

काल मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मोठी प्रतिक्रिया दिली होती. नागपूरमध्ये बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपण आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारनेच सर्वाधिक प्रयत्न केल्याचे म्हटले होते. तर ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला दिले जाणार नसल्याने ओबीसी समाजाला घाबरण्याची काहीएक गरज नाही अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सुरूवातीपासूनच सरकारची सकारात्मक भूमिका राहिली आहे. न्यायालय, कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही कुठलाही निर्णय घेण्यास तयार आहोत, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केली होती.

तर केवळ प्रसिद्धीसाठी घेतलेले निर्णय टिकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालय , न्यायालयाचे निर्णय लक्षात घेऊनच पुढे जावे लागेल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. काल मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट