
माजी प्रदेशाध्यक्ष जयंत हे पक्षाच्या नाशिकमधील शिबिरात पोहचले आहेत. या शिबिरात पक्षाचे मोठे नेते सहभागी झाली आहेत. शिबिरात पोहोचल्यावर जयंत पाटील हे वेगळ्याच पूजेच्या कार्यक्रमाला गेले होते. आपल्या शिबिराला कोणी पूजा ठेवली आहे असे मिश्किल वक्तव्य जयंत पाटील यांनी कार्यकर्तांसोबत केले आणि या वक्तव्याने हास्य कल्लोळ उपस्थितांमध्ये बघायला मिळाला. सध्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला जोरदार विरोध होताना दिसतंय. आशिया कप 2025 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला रंगणार आहे. दुबईत हा सामना सुरू होईल. मात्र, भारतातून या सामन्याला विरोध होत आहे.
जयंत पाटील यांनी म्हटले की, मला कार्यक्रमाला यायला उशीर झाला कारण वंदे भारत ट्रेन ही लेट होती त्यामुळे. मी काही नाराज नाही आहे. मी आलो आहे कार्यक्रमाला. यावेळी जयंत पाटील यांनी भारत आणि पाकिस्तान सामन्यावर भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले की, पाकिस्तानने ज्याप्रकारे पहलगाम हल्ला केला त्यानंतर त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणेच चुकीचे आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात की, खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही आणि क्रिकेट खेळले जाते.
महिन्याला धोरण बदल असल्याचे दिसतंय. भारत पाकिस्तान सामन्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही विरोध असल्याचे यावरून दिसत आहे. मागील काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज असल्याचे बोलले जातंय. हेच नाही तर ते नाशिकमधील शिबिरात सहभागी होणार की नाही? यावर जोरदार चर्चा रंगत असतानाच जयंत पाटील हे शिबिरात सहभागी झाले आहेत. शिबिरात काय होईल, याबद्दलची माहिती संध्याकाळी दिली जाईल, असे त्यांनी म्हटले.
जयंत पाटील हे शिबिरात पोहोचल्याने आता त्यांच्या नाराजीचा चर्चा दूर होऊ शकतात. जयंत पाटील थेट म्हणाले की, मला शिबिरात यायला उशीर हा वंदे भारत ट्रेनमुळे झाला. वंदे भारत लेट होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या शिबिराकडे सर्वांच्या नजरा असल्याचे बघायला मिळतंय. रोहिणी खडसे या देखील मागील काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहेत.
रोहिणी खडसे यांनी बोलताना म्हटले की, ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपल्या भारतीय सैन्यांना पाकिस्तानला उत्तर दिलं. सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग यांना जी संधी मिळाली ती शरद पवारांमुळे. महिला सक्षमीकरणाचा निर्णय शरद पवारांनी घेतलेला त्यामुळे आज महिलांना संधी मिळत आहेत. आजच्या काळात ज्या मुली शिक्षण घेत आहे ग्रामीण भागात महिला सुशिक्षित करण्यासाठी शरद पवार साहेबांनी पाया भरणी केली.
ग्रामीण महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्यभर बचत गटाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे आणि शरद पवार साहेबांनी जाळ उभ केले. मला अभिमान आहे मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात महिलांना सन्मानाची जागा मिळते. ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढून कामावर घेऊन जायचे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट होती. लाडकी बहीण योजना चांगली पण अनेक महिलांना लाभापासून वंचित ठेवले जाते. महिला माता भगिनींसाठी एक मोठा आंदोलन उभा कराव. महिलाच्या तक्रारी एकूण घेत नाही, लोकल पोलिस मदत करत नाहीत.
ह्या सरकारमध्ये महिलांचा अपमान होतो हे नवीन नाही. महिलांसाठी आपण लढलो पाहिजे, रस्त्यावर उतरेल पाहिजे.
महिला अधिकारांना सत्तेतील मंत्री दम भरतात, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले. एकनाथ खडसे यांनी म्हटले की, आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केल्या आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तो प्रश्न सोडवावा तर आमची काही हरकत नाही
महाराष्ट्रामध्ये अलीकडे जातीजातींमध्ये संघर्षाची भूमिका तयार झाली आहे. ओबीसींचे आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलन सुरू झालं. बंजारा समाजाने एसटीमध्ये आरक्षण मागितलं. कोळी समाजाने महादेव कोळी एसटीमध्ये आरक्षण मागितलं. लिंगायत समाजाने आम्हाला वेगळा धर्म द्यावा म्हणून मागणी केली. महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे म्हणून शरद पवारांनी कालची भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वांना माहित आहे की ही भूमिका कोणी घेतली आहे आणि कोणी हे स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे.