पाटलांनी ठेवलं सरकारमधील नाराजीवर बोट, सरकार किती दिवस टिकेल थेट सांगूनच टाकलं…

| Updated on: Sep 22, 2022 | 8:16 PM

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या प्रत्येकाला मंत्री व्हायचे असल्याने शिंदे यांची अडचण होत असल्याचे सांगत सरकार कधीही कोसळू शकते अशी भविष्यवाणी पाटील यांनी केली.

पाटलांनी ठेवलं सरकारमधील नाराजीवर बोट, सरकार किती दिवस टिकेल थेट सांगूनच टाकलं...
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात राज्यातील सरकारबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच विरोधक सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली आहे. नाशिक दौऱ्यावर असतांना जयंत पाटील यांनी सरकारमधील नाराजीवर बोट ठेवले आहे. शिंदे यांच्या सोबत असलेल्या प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. प्रत्येक जन प्रयत्न करतोय त्यामुळे शिंदे यांची अवस्था काय होत असेल ? असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी शिंदे यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटते असे म्हणत सरकारला चिमटे काढले आहे. सरकारमध्ये अनेक जन नाराज असल्याच्या मुद्द्यावरून पाटील यांनी सरकारच्या नाराजीवर बोट ठेऊन टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती आहे असे म्हणून नाराजीवर बोट ठेवत टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या प्रत्येकाला मंत्री व्हायचे असल्याने शिंदे यांची अडचण होत असल्याचे सांगत सरकार कधीही कोसळू शकते अशी भविष्यवाणी पाटील यांनी केली.

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये नाराजी असल्याने मंत्रिमंडळ विस्तार उशिरा झाल्याची मोठी चर्चा होती, त्यातच आता पालकमंत्री पद देण्यावरून नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने, सरकारमधील नाराजी असल्याने अधिकारी देखील सरकारचे ऐकत नसल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे.

शिंदे – फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही, आता त्यांचे अधिकारी देखील ऐकत नाही असे म्हणत सरकारवर पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

जयंत पाटील यांनी याशिवाय येत्या काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस स्थानिक पातळीवर कॉँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करून लढण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणाले आहे.

त्यामुळे पाटील यांनी कॉँग्रेससह शिवसेनेला देखील आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढण्याबाबत साद घालू पाहत होते का ? असाही मुद्दा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.