राज्य सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार; जयंत पाटलांचं मोठं विधान

पत्राचळ प्रकरणी शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुबंईचा पालकमंत्री होतो मलाही पत्राचाळीतील लोक भेटायला आले होते. भाजपला नैराश्य आले आहे, त्यामुळेच आरोप आणि टीका सुरू आहे, असं ते म्हणाले.

राज्य सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार; जयंत पाटलांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 6:29 PM

चंदन पूजाधिकारी, नाशिक: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपवर (bjp) जोरदार निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालय 40 आमदारांना कधीही बरखास्त करू शकतात. सर्व 40 आमदारांना मंत्री व्हायचे आहे. हे 40 जण किती त्रास देत असतील. पण माझी सहानुभूती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासोबत आहे, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला. भाजपच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आल्याने भाजपचे 106 आमदारही नाराज आहेत. सरकार अस्थिर असल्याचं प्रशासनालाही समजून चुकलं आहे. त्यामुळे अधिकारीही ऐकत नाहीत. काही आमदार तर खासगीत कुठून अवदसा आठवली अन् यांच्या नादाला लागलो असं सांगतात, असा दावाही त्यांनी केला.

जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवसेनेवर बोलण्यासारखे काही नसल्यानं शरद पवार आणि राष्ट्रवादीला दोष देत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्याच कारण नाही. दुसरा गट बीकेसीला गेला. त्यामुळे शिवसेनेला मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्याची गरजच नव्हती. पोलीस आणि मनपाकडे सबळ कारण नाही. त्यांनी परवानगी दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पत्राचळ प्रकरणी शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुबंईचा पालकमंत्री होतो मलाही पत्राचाळीतील लोक भेटायला आले होते. भाजपला नैराश्य आले आहे, त्यामुळेच आरोप आणि टीका सुरू आहे, असं ते म्हणाले.

फडणवीस यांना संपविण्याचा प्रयत्न कधी केला नाही. अशी कुठली कृती केली असेल ती आम्हाला संगावी. आम्ही त्यांचा सन्मान केला. त्यांना असे का वाटते माहीत नाही. निवांत भेटले को विचारेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.