आरे, नाणार, भीमा कोरेगावनंतर मराठा मोर्चातील गुन्ह्यांचा मुद्दा, जितेंद्र आव्हाडांसह धनंजय मुंडे आक्रमक

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर आपल्या आश्वसनांच्या पुर्ततेवर जोर दिल्याचं दिसत आहे. यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे आघाडीवर आहेत.

आरे, नाणार, भीमा कोरेगावनंतर मराठा मोर्चातील गुन्ह्यांचा मुद्दा, जितेंद्र आव्हाडांसह धनंजय मुंडे आक्रमक

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर आपल्या आश्वसनांच्या पुर्ततेवर जोर दिल्याचं दिसत आहे. यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. सुरुवातीला या नेत्यांनी आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली (Maratha Morcha Cases). त्यानंतर नाणार आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांबाबतही निर्णय घेण्याची मागणी केली. आता त्यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे (Maratha Morcha Cases).


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निवडणुकीतील आपल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (3 डिसेंबर) मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याकडे ही मागणी केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.”


आमदार धनंजय मुंडे यांनी देखील हीच मागणी लावून धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी निवेदन दिले आहे. धनंजय मुंडे म्हणाले, “मराठा समाजाने आरक्षणासाठी शांतीपूर्ण आंदोलन केले. त्यावेळी सहभागी युवकांवर तत्कालीन भाजप सरकारनं दाखल केले. आता ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. एकही तरुण या गुन्ह्यांमुळे शिक्षण, नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी योग्य पाऊल उचलावे.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *