
सध्या राज्यभरात अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. नाशिकच्या या भोंदू बाबाचे एक -एक कारणामे आता समोर येत आहेत. दरम्यान या प्रकणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अशोक खरात याने 2017 मध्ये एका पत्रकाराचा खून केला होता. एका वर्तमान पत्रात त्यासंदर्भात 10 अर्टिकल देखील छापून आले होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे, एवढंच नाही तर पोलिसांनी या प्रकरणात खरात याला वाचवण्याचा प्रयत्न केला. कोणत्या अधिकाऱ्याने किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे, असा गौप्यस्फोट देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी असा दावा देखील केला आहे की, सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाला होता. हे मुख्यमंत्र्यांना देखील माहिती आहे. 38 आमदारांची यादी आहे. कॅमेरासमोर खरातला ठेवा, देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला धक्का लावण्यासाठी अनेक आमदार त्या ठिकाणी लाईन लावून बसले होते. ते ज्या आर्थी एवढी कारवाई करत आहे, त्या आर्थी त्यांना हे सर्व माहीत आहे, असं यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जेफरी एफ्स्टीनच्या फाईल जगाला कळू नये, म्हणून आता इराणचं युद्ध सुरू आहे. या सर्व प्रकरणामुळेच जेफरी एफ्स्टीनची हत्या झाली होती. तशीच भीती मला आता अशोक खरातबद्दल देखील वाटत आहे, त्यामुळे त्याला वाचवा असंही यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे.
नाना पटोलेंनी काय म्हटलं?
अशोक खरात शुद्धीकरणाच्या नावाने महिलांना जाळ्यात फसवायचा, माझ्याकडे 58 नाही तर 250 प्रकरणं आहेत. त्याने अनेक उद्योगपतिंना फसवले आहे. अनेक राजकारणी लोकांचा देखील यामध्ये समावेश आहे. आम्ही त्याला पाणी दिलं, असंही काही जण म्हणाले. मात्र ते आम्ही मंदिराच्या विकासासाठी दिलं होतं. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले तेव्हाच हे सगळं समोर आलं होतं. खरात प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरु होता. पण नंतर मुंबईतील सहाव्या मजल्यावरून आदेश गेला आणि प्रकरण बाहेर आलं, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.