
Kalyan Dombivli Election Result : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. महापालिका निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी भाजपाच मोठा पक्ष ठरला आहे. परंतु अन्य पक्षांचे तसेच अपक्ष नरगेसवकांच्य मदतीने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न राज्यभरात चालू आहे. ज्या ठिकाणी बहुमतासाठी नगरसेवकांची कमतरता असून सत्ता येण्याची शक्यता असेल तर अशा ठिकाणी घोडेबाजार तसेच अन्य पक्षांच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतर अशा घडामोडी चांगल्याच वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे दोन नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असे सांगितले जात आहे. हे दोन्ही नगरसेवक लवकरच फुटणार असल्याेही बोलले जात आहे. त्यामुळेच आता ठाकरे गटामध्ये मोठी अस्थिरता पसरली आहे. कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाने मोठा आणि चकित करणारा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या दोन्ही नगरसेवकांच्या घरावरठ टाकरे गटान नोटीस लावली आहे. महापालिकेसाठी गटनेता निवडीच्या सभेला उपस्थित राहावे अन्यथा मोठी कारवाई केली जाईल, असे या सूचनेत सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार KDMC मध्ये ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. हीच बाब लक्षात घेता पक्षात बंडखोरीच्या शक्यतेने ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील आक्रमक झाले आहेत.
या नोटिशीच्या माध्यमातून गटस्थापन व गटनेता निवडीच्या सभेला हजर राहण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. अनुपस्थित राहिल्यास पक्षविरोधी भूमिका मानून कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दोन्ही नगरसेवकांच्या घरावर थेट नोटीस लावून तशी ताकीद देण्यात आली आहे. या नोटिशीमुळे महापौर निवडीआधीच ठाकरे गटात अंतर्गत अस्थिरता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, ठाण्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाकडून पूर्ण ताकद लावली जात आहे. वंचित, अपक्ष आणि काही ठाकरे गटाच्या नगरसेवकांना सोबत घेऊ शिंदे गटाचाच महापौर बसवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.