पत्नीचे मसाज पार्लरमधील ग्राहकाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीची भलतीच करामत

मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत तुमचे अनैतिक संबंध आहेत, त्यावरुन आम्ही कारवाई करणार, असं महिलेच्या पतीने तोतया पोलीस अधिकारी असल्याचं भासवून धमकावलं (Kalyan Husband Massage Parlor )

पत्नीचे मसाज पार्लरमधील ग्राहकाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीची भलतीच करामत
तोतया पोलिसाला अटक
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:55 AM

कल्याण : मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या पत्नीचे एका ग्राहकासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. याचाच गैरफायदा घेत महिलेच्या पतिने खोटा पोलिस अधिकारी बनून ग्राहकाकडून पाच लाख रुपये उकळले. आणखी पाच लाख रुपयांची रक्कम घेताना या तोतया पोलिसाला कल्याणमधील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तुषार शिलवंत असे आरोपी पतीचे नाव आहे. (Kalyan Husband threatens posing as Police for Extra Marital Affair of wife working at Massage Parlor with Customer)

मसाज पार्लरमधील महिलेशी तक्रारदाराची मैत्री

ठाण्यातील संबंधित मसाज पार्लरमध्ये जाणे डोंबिवलीतील ग्राहकाच्या चांगलेच अंगलट आले. डोंबिवलीत सागर्ली परिसरात राहणारे शंकर परब हे काही दिवसांपूर्वी मसाज पार्लरमध्ये गेले होते. मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेशी त्यांची ओळख झाली. त्याचं रुपांतर पुढे मैत्रीत झालं.

महिलेच्या पतीचा तोतया पोलीस म्हणून फोन

एके दिवशी शंकर परब यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख वाशी येथील क्राईम ब्रांच युनिटचा पोलिस अधिकारी अशी सांगितली. मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत तुमचे जे अनैतिक संबंध आहेत, त्यावरुन आम्ही कारवाई करणार आहोत. कारवाई टाळायची असल्यास दहा लाख रुपय द्या, असं फोनवरील व्यक्तीने सांगितलं.

शंका आल्याने तक्रारदार पोलीस स्टेशनला

शंकर परब चांगलेच घाबरले. त्यांनी लगेच आरोपीला पाच लाख रुपये देण्यासाठी बोलावले. मात्र पैसे देण्याआधी त्यांना शंका आली. त्यामुळे शंकर यांनी मानपाडा पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली. मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अनंत लाम आणि सिनिअर पीआय दादा हरी चौरे यांच्या मागदर्शनाखाली पोलिस तपास सुरु झाला. सापळा रचून तुषार शिलवंत याला अटक करण्यात आली. (Kalyan Husband Massage Parlor)

पत्नीसोबत वादातून पतीची भलतीच करामत

तुषारच्या अटकेनंतर धक्कादायक प्रकार समोर आला. तुषार हा मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेचा पती आहे. त्यांच्यात वाद सुरु आहे. ते दोघं वेगळे राहतात. फक्त पत्नीसोबत शंकरची यां मैत्री आहे, याचा फायदा घेत त्याने ब्लॅकमेल केले. तुषार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडाला. तुषारच्या पत्नीचा या गुन्ह्यात कितपत सहभाग आहे, याचा पोलिस तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

सूनेसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बापाने केली मुलाची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन वकिल महिलेची हत्या; पतीला जन्मठेप, सासऱ्याला सक्तमजुरी

(Kalyan Husband threatens posing as Police for Extra Marital Affair of wife working at Massage Parlor with Customer)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.