AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच : मुंबई सत्र न्यायालय

धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली होती. न्यायालयाच्या याच याचिकेची सविस्तर प्रत आता समोर आली आहे.

करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच : मुंबई सत्र न्यायालय
| Edited By: | Updated on: Apr 09, 2025 | 8:15 PM
Share

करुणा मुंडे (Karuna Munde) आणि धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत, असे माझगाव सत्र न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका माझगाव सत्र न्यायालयाने फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या याच आदेशाची सविस्तर प्रत आता समोर आली आहे. याच सविस्तर प्रतीमध्ये करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत, असं माझगाव सत्र न्यायालयाने म्हटले आहे.

माझगाव सत्र न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचा निकाल वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाने दिला होता. याच निर्णयाला धनंजय मुंडे यांनी याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिलं होतं. हीच याचिका फेटाळून माझगाव सत्र न्यायालयाने 5 एप्रिल रोजी निकाल दिला होता. या निकालाची प्रत आता समोर आली आहे. या निकालात दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

करुणा मुंडे दिलासा मिळण्यास पात्र- कोर्ट

आपल्या याचिकेत करुणा मुंडे यांच्याशी लग्न केलं नसल्याचा धनंजय मुंडे यांनी दावा केला होता. मात्र धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत, असं सत्र न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. तसेच एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा मुंडे यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

5 एप्रिल रोजी नेमकं काय घडलं होतं?

धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे इच्छापत्र सादर केले होते. याच इच्छापत्रात करुणा मुंडे यांचा पहिली पत्नी असा उल्लेख आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या इच्छापत्रात चार मुलांची नावे होती. हे इच्छापत्र खरं असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे करुणा मुंडे यांनी सादर केलेलं धनंजय मुंडे यांचं इच्छापत्र हे खोटं असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला होता. 2017 सालाच्या आसपास हे इच्छापत्र बनवण्यात आल्याची नोंद आहे. याच सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली होती.

Follow Us
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?
प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा
Rohit Pawar : प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा कोणाला अप्रत्यक्ष टोला
माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस..
Pradeep Purnekar : माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस ठाण्याबाहेर बॅनरबाजी; तपासावर प्रश्नचिन्ह
महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का?
Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल